अॅडलेडच्या मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघाने अनपेक्षित ‘फिनिक्सभरारी’ घेतली. मेलबर्नवरील महाविजय आणि सिडनीमधील संस्मरणीय अनिर्णीत लढतीमुळे ऑस्ट्रेलियाचा अहंकार दुखावला आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या ब्रिस्बेनच्या चौथ्या कसोटी सामन्यात दुखापग्रस्त जसप्रीत बुमराह आणि आर. अश्विन यांना आराम देण्यात आला आहे. टी. नटराजन आणि वॉशिंगटन सुंदर यांचं कसोटी पदार्पण झालं आहे. त्याशिवाय मयांक अगरवाल आणि मुंबईकर शार्दुल ठाकूरलाही संधी देण्यात आली आहे. अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना झालेल्या दुखापतीमुळे ‘अ’ संघाप्रमाणे भासणाऱ्या भारताची ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी लागणार आहे.
बॉर्डर-गावस्कर चषक जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला अखेरची कसोटी जिंकणे आवश्यक आहे, परंतु भारताला चषक आपल्याकडे राखण्यासाठी ही लढत अनिर्णीत राखणेसुद्धा पुरेशी ठरेल. ब्रिस्बेनवर ऑस्ट्रेलियाच्या संघाने १९८८नंतर एकही कसोटी सामना गमावलेला नाही. त्यामुळे त्यांना मालिका गमावणार नाही, अशी आशा आहे. हनुमा विहारी, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, रविंद्र जाडेजा या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागी मयांक अगरवाल, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकूर आणि टी-नटराजन यांना संधी देण्यात आली आहे.
असा आहे भारतीय संघ –
अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, मयांक अगरवाल, ऋषभ पंत(यष्टीरक्षक), नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, टी. नटराजन, वॉशिंग्टन सुंदर
4th Test. India XI: R Sharma, S Gill, C Pujara, A Rahane, M Agarwal, R Pant, W Sundar, S Thakur, N Saini, M Siraj, T Natarajan https://t.co/gs3dZfCcVQ #AUSvIND
— BCCI (@BCCI) January 14, 2021
पुकोवस्कीऐवजी हॅरिस सलामीला
खांद्याला झालेल्या दुखापतीतून सावरू न शकलेला ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर विल पुकोवस्कीने चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. त्याच्या जागी मार्कस हॅरिसला संघात स्थान मिळाले आहे. सिडनीच्या पदार्पणीय लढतीत पुकोवस्कीने अर्धशतक झळकावून निवड सार्थ ठरवली होती. मात्र कसोटीच्या पाचव्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना त्याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली. गतवर्षी अॅशेस मालिकेत हॅरिसने ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले होते. नऊ कसोटी सामन्यांत ३८५ धावा त्याने काढल्या आहेत.
ऑस्ट्रेलिया (११ जण) : टिम पेन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लबूशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरून ग्रीन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवूड
4th Test. Australia XI: D Warner, M Harris, M Labuschagne, S Smith, M Wade, C Green, T Paine, P Cummins, M Starc, N Lyon, J Hazlewood https://t.co/gs3dZfCcVQ #AUSvIND
— BCCI (@BCCI) January 14, 2021
खेळपट्टी आणि हवामानाचा अहवाल
ब्रिस्बेन कसोटी सामन्याच्या पाचही दिवसांवर पावसाचे सावट असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. खेळपट्टीकडून फलंदाजीला उत्तम साथ मिळेल. वेगवान गोलंदाजांना मात्र अधिक मेहनत करावी लागेल, तर खेळपट्टीवर चेंडू अतिरिक्त उसळत असल्याने फिरकी गोलंदाज प्रभावी ठरू शकतात.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 15, 2021 5:31 am