21 January 2021

News Flash

फिंचचं दमदार अर्धशतक; आरसीबीच्या चाहत्यांनी केलं ट्रोल

फिंचने पाच हजार धावांचा टप्पा पार केला

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने पहिल्या एकदिवसीय सामन्यात दमदार अर्धशतकी खेळी केली. या अर्धशतकी खेळीसब फिंचनं एकदिवसीय सामन्यात पाच हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. फिंच- वॉर्नर यांनी ऑस्ट्रेलियाला सावध सुरुवात करुन देत सन्माजनक धावसंख्याकडे आगेकूच केली आहे. फिंचं कर्णधाराला साजेशी खेळी केली आहे. मात्र, फिंचची ही दमदार खेळी आरसीबीच्या चाहत्यांना फारशी आवडलेली दिसत नाही. सोशल मीडियावर फिंचला ट्रोल केलं जात आहे.

फिंच आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या आरसीबी संघाचा सदस्या होता. आरसीबीकडू खेळताना फिंचला लौकिकास साजेशी खेळी करता आली नव्हती. आयपीएलमध्ये फिंचने १२ सामन्यात फक्त एका अर्धशतकाच्या मदतीनं २६८ धावा केल्या होत्या. चांगल्या सुरुवातीनंतरही फिंचला आयपीएलमध्ये मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. पण सध्या सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात फिंचनं दमदार अर्धशतकी खेळी केली आहे. त्यामुळे आरसीबीच्या चाहत्यांना राग अनावर आला आहे.

फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांची पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे. दोन्ही खेळाडूंनी मैदानावर पाय स्थिरावल्यानंतर भारतीय गोलंदाजांवर आक्रमक करायला सुरुवात केली. पहिल्या २७ षटकांनंतरही ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी फोडण्याचे भारतीय संघाचे प्रयत्न फेल ठरले आहेत. २७ षटकानंतर ऑस्ट्रेलियानं बिनबाद १४९ धावा केल्या आहेत.

कर्णधार अॅरोन आरोन फिंचने १२६ व्या डावांत पाच हजार धावांचा टप्पा पार केला आहे. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक वेगवान पाच हजार धावा करणाऱ्या फलंदाजामध्ये फिंच दुसऱ्या क्रमांकावर आहे. डेविड वॉर्नरनं ११५ डावांत पाच हजार धावांचा टप्पा पार केला होता. तिसऱ्या क्रमांकावर डीन जोन्स असून त्यांनी १२८ डावांत हा टप्पा पार केला होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2020 11:20 am

Web Title: india vs australia finch rcb troll nck 90
Next Stories
1 वडिलांच्या मृत्यूचा संदर्भ देताना चुकला गिलख्रिस्ट, सोशल मीडियावर चाहते खवळले
2 कोहलीच्या प्रश्नानंतर BCCI चं रोहितच्या दुखापतीवर स्पष्टीकरण….
3 Ind vs Aus : बाळाच्या जन्मावेळी मला बायकोसोबत रहायचं आहे – विराट कोहली
Just Now!
X