02 March 2021

News Flash

चौथा कसोटी सामना राहणार अनिर्णित; गुगलनं दिला कौल

पाचव्या दिवशी काय होणार?

IND vs AUS Gabba Test : ब्रिस्बेन येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियानं २९४ धावांपर्यंत मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे चौथ्या कसोटीत ऐतिहासिक विजयासाठी भारतीय संघाला ३२८ धावांची आवशकता आहे. चौथ्या दिवसाचा उर्वरित खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. सामना थांबवण्यापूर्वी दुसऱ्या डावात भारतानं नाबाद चार धावा केल्या आहेत. भारतीय संघ अद्याप ३२४ धावांनी पिछाडीवर आहे. पाचव्या दिवशी भारतीय संघाला ९८ षटकांत ३२४ धावा काढायच्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाला १० बळी घ्यावे लागतील. पण गुगलनं चौथा कसोटी सामना अनिर्णित राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गुगलच्या मते निर्णायक चौथा कसोटी सामना अनिर्णित राहण्याची शक्यता ५९ टक्के आहे.

आणखी वाचा- सिराजचा ऑस्ट्रेलियाला ‘पंच’; जहीरच्या विक्रमाची केली बरोबरी

गुगलनं दाखवलेल्या अंदाजानुसार भारताला ही सामना जिंकण्याची शक्यता खूपच कमी आहे. गुगलच्या मते टीम इंडिया हा सामना जिंकण्याची फक्त ४ टक्के शक्यता आहे. त्याउलट ऑस्ट्रेलियाचा संघ या सामन्यात ३७ टक्के जिंकण्याची शक्यता आहे. गुगलनं ही शक्यता वर्तवली आसली तरीही यामध्ये बदल होतच राहतो. तेथील परिस्थिती आणि संघाच्या खेळ तसेची लोकांच्या मतांनुसार ही शक्यता ठरवली जाते. तिसऱ्या कसोटी सामन्याप्रणाणेच भारतीय संघानं धेर्यानं आणि जिद्दीनं फलंदाजी केल्यास अखेरच्या कसोटी सामन्यात टीम इंडिया विजय नोंदवू शकतो.

पाहा गुगल काय म्हणतेय

बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियानं तर दुसऱ्या सामन्यात भारतानं विजय मिळवला होता. तिसरा कसोटी सामना भारतीय संघान अनिर्णित राखला होता. त्यामुळे अखेरच्या कसोटी सामन्यात विजय मिळवून चषकावर नाव कोरण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल.

रोहित शर्माने केलेली ती कृती स्मिथची नक्कल की टोमणा?; ‘हा’ Video ठरतोय चर्चेचा विषय

गाबाच्या मैदानावर आतापर्यंत चौथ्या डावात २५० पेक्षा जास्त धावांचं आव्हान एकदाही कोणत्याही संघाला पार करता आलं नाही. शिवाय, मागील १०० वर्षात या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा संघ आतापर्यंत एकदाही पराभव झाला नाही. त्यामुळे ब्रिस्बेनमधील गाबा मैदानावरील हा रेकॉर्ड भारतीय संघ मोडणार का? याकडे क्रीडा प्रेमींचं लक्ष लागलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2021 3:36 pm

Web Title: india vs australia google showing draw probability as 59 percentage india tour australia nck 90
Next Stories
1 IND vs AUS : यष्टीमागे पंतला आठवलं हे भोजपुरी गाणं, व्हिडीओ झाला व्हायरल
2 IND vs AUS: शार्दुलची अष्टपैलू कामगिरी; कपिल देव, इरफान पठाण यांच्या पंगतीत स्थान
3 जिंकलस भावा… पाच विकेट्स घेणाऱ्या सिराजला ड्रेसिंग रुमच्या वाटेवर मिळाली खास झप्पी
Just Now!
X