भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेकदा ‘Nervous 90’ चा शिकार झाला आहे. तुम्ही अनेकदा सचिन तेंडुलकरला ९० ते ९९ या धावसंखेवर बाद होताना पाहिलं आहे. सचिनशिवाय इतर भारतीय खेळाडूही ‘Nervous 90’ चे शिकार झाले आहेत. या यादीत आता हार्दिक पांड्याचाही समावेश झाला आहे. हार्दिक पांड्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ९० धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियामध्ये ९० – ९९ धावसंख्येवर बाद होणारा हार्दिक पांड्या नववा खेळाडू ठरला आहे. याआधी सचिन पासून रोहित शर्मापर्यंत अनेक दिग्गद खेळाडू ऑस्ट्रेलियात ‘Nervous 90’ चे शिकार झाले आहेत.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पांड्यानं संकटात सापडलेल्या भारतीय संघासाठी तुफानी ९० धावांची खेळी केली. मात्र, दुसऱ्या बाजूला पांड्याला एकाही फलंदाजानं साथ दिली नाही. परिणामी मोठा फटका मारण्याच्या नादात पांड्या ९० धावांवर बाद झाला. पांड्यानं ४ आणि सात चौकारांच्या मदतीनं ७६ चेंडूत ९० धावा चोपल्या.

ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय सामन्यात ‘Nervous 90’ चे शिकार झालेले खेळाडू –

अझरूद्दीन – ९३
सचिन – ९३
सेहवाग – ९०
सचिन – ९१
गंभीर – ९२
गंभीर – ९१
कोहली – ९१
रोहित – ९९
हार्दिक – ९०

दरम्यान फिंच (११४) आणि स्मिथ (१०५) यांच्या दमदार शतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियानं निर्धारित ५० षटकांत ३७४ धावांचा डोंगर उभा केला होता. या आवाहनाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. १०० धावात भरातीय संघानं पहिल्या चार विकेट गमावल्या होत्या. हार्दिक पांड्यानं ९० धावांची खेळी करत भारताचा डाव सावरला.