दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ६ गड्यांनी पराभव करत भारतानं तीन सामन्याच्या मालिकेत २-० नं अजेय आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यात हार्दिक पांड्या, के. राहुल, विराट कोहली आणि युवा नटराजन विजयाचे हिरो ठरले होते. हार्दिक पांड्यानं केलेल्या तुफानी ४२ धावांच्या खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. सामन्यानंतर या पुरस्काराबाबतच्या हार्दिक पांड्याच्या वक्तव्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सामन्यानंतर बोलताना हार्दिक पांड्या म्हणाला की, ‘नटराजनच्या कामगिरीनं मी प्रभावीत झालो आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात नटराजननं केलेली कामगिरी स्वप्नवत आहे. दुसऱ्या सामन्यात माझ्याऐवजी सामनावीर पुरस्काराचा खरा हकदार नटराजन आहे. दुसऱ्या गोलंदाजांच्या तुलनेत नटराजन यांनं खूप चांगली गोलंदाजी केली आहे. चार सामन्यात नटराजन यानं फक्त २० धावा देत दोन महत्वाचे बळी घेतले आहेत. त्यामुळे सामन्याचा खरा हिरो नटराजन आहे. तो सामनावीर पुरस्कारासाठी पात्र आहे. ‘

लॉकडाउनच्या काळात विजयवीर बनण्यासाठी कोणत्या बाबींवर लक्ष केंद्रित करावं, याचा मी सराव केला. तसेच अनेकांशी यासंबंधी च्चाही केली. आयपीएलमध्येही मी आशा प्रकारच्या खेळ्या साकार केल्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना मला नेहमीच स्वत:च्या फटक्यांवर आधिक विश्वास वाटतो. परंतु, माझ्याऐवजी सामनावीर पुरस्काराचा खरा मानकरी नटराजन होता, असं हार्दिक पांड्या म्हणाला.

पंड्या म्हणाला की, ‘धावांचा पाठलाग करणं खूप सोपं आहे. मी नेहमी स्कोअरबोर्ड पाहून फलंदाजी कतो. यामुळे आपल्याला कोणत्या गोलंदाजांना लक्ष करायचं याचा अंदाज लागतो. मी या परिस्थितीत खूप वेळा खेळलो आहे. गेल्या काही दिवसांमध्ये चुकातून शिकलो आहे. लॉकडाउनमध्ये त्यावर काम केलं आहे.’

आणखी वाचा :

पांड्याची फलंदाजी पाहून ऑस्ट्रेलियाला आठवला धोनी

भारताच्या विजयावर रोहितची प्रतिक्रिया, म्हणाला…

रोहित-बुमराहशिवाय भारतानं टी-२० मालिका जिंकली, पाहा विराट कोहली काय म्हणाला…

वसीम जाफरचा फ्री हीट… ‘गँग्स ऑफ वासेपूर स्टाइल’मध्ये इंग्लंडच्या खेळाडूला केलं ट्रोल