भारतीय संघानं दुसऱ्या टी-२० सामन्यात सहा गड्यांनी मात करत ऑस्ट्रेलिचा पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघानं तीन सामन्याची मालिकेत २-० नं आघाडी घेतली आहे. विराट कोहली, शिखर धवन, हार्दिक पांड्या आणि नटराजन यांच्या कामगिरीच्या बळावर भारतीय संघानं विजयी मालिका कायम ठेवली. भारतीय संघाच्या विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये आनंदाचं वातावरण होतं. सामन्यानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये तीन केक कापण्यात आले आहेत.
होय! सामन्यानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये तीन केक कापण्यात आले होते. शिखर धवन, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांनी केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. शिखर धवन याचा वाढदिवस ५ डिसेंबर रोजी होता. तर जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांचा वाढदिवस ६ डिसेंबर रोजी असतो. भारतानं सामना जिंकल्यानंतर सहकाऱ्यासोबत आनंद व्यक्त करताना या तिन्ही खेळाडूंनी वाढदिवसाचा केकही कट केला.
या प्रसंगाचा व्हिडीओ बीसीसीआयनं आपल्या ट्विटर खात्यावर पोस्ट केला आहे. यामध्ये शिखर, बुमराह आणि श्रेयस अय्यर केक कट करताना दिसत आहेत. संघातील इतर सहकारी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाही दिसत आहे. विजयानंतर संघाच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण आनंदात वाहून निघालं आहे.
पाहा व्हिडीओ –
Let the celebrations begin!
December – @SDhawan25
December – @ShreyasIyer15 & @Jaspritbumrah93 and series win with a match to spare!What a day for #TeamIndia in Australia pic.twitter.com/EoNQApMT16
— BCCI (@BCCI) December 6, 2020
आणखी वाचा :
पांड्याची फलंदाजी पाहून ऑस्ट्रेलियाला आठवला धोनी
भारताच्या विजयावर रोहितची प्रतिक्रिया, म्हणाला…
पांड्या म्हणतो, “सामनावीरचा खरा मानकरी मी नाही, तर…”
रोहित-बुमराहशिवाय भारतानं टी-२० मालिका जिंकली, पाहा विराट कोहली काय म्हणाला…
वसीम जाफरचा फ्री हीट… ‘गँग्स ऑफ वासेपूर स्टाइल’मध्ये इंग्लंडच्या खेळाडूला केलं ट्रोल
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 7, 2020 10:01 am