तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा १३ धावांनी पराभव केला. या विजयासह भारतानं व्हाइटवॉश होण्यापासून लाज राखली आहे. ऑस्ट्रेलियानं तीन सामन्याची कसोटी मालिका २-१ नं जिंकली आहे. तिसऱ्या सामन्यात भारताच्या विजयात मुंबईकर खेळाडूनं मोलाची भूमिका उचलली आहे. या खेळाडूचं नाव शार्दुल ठाकूर आहे.

तीन सामन्याच्या मालिकेत शार्दुलला पहिल्यांदाच संधी मिळाली होती. शार्दुलनेही संधीचं सोनं करत भारतालाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाची गोलंदाजी सुमार दिसत होती. मात्र शार्दुल ठाकूर आणि नटराजन या युवा खेळाडूंनी भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

पहिल्या दोन सामन्यात भारताची डोकेदुखी ठरेलेल्या स्टिव्ह स्मिथला बाद करत भारताच्या विजायचं द्वार शार्दुलनं उघडलं होतं. शार्दुल ठाकूरनं १० षटकांमध्ये ५३ धावा देत ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना बाद केले. ऑस्ट्रेलियाची मजबूत मधली फळी शार्दुल ठाकूरनं मोडून काढली. शार्दुल ठाकूरच्या शिस्तबद्ध गोलंदाजीचं सोशल मीडियात कौतुक होत आहे.

दरम्यान, शार्दुल ठाकूर, टी. नटराजन, जसप्रीत बुमराह यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने अखेरच्या वन-डे सामन्यांत ऑस्ट्रेलियाचं आव्हान मोडीत काढत बाजी मारली आहे. अंतिम सामन्यात १३ धावांनी बाजी मारत भारतीय संघाने व्हाईटवॉशची नामुष्की टाळली आहे. ऑस्ट्रेलियाकडून फिंच, मॅक्सवेल यांनी फटकेबाजी करत चांगली झुंज दिली, परंतू मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाज वरचढ ठरले.