भारताच्या विजयात रविंद्र जाडेजानं अष्टपैलू कामगिरी करत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला आहे. प्रथम फलंदाजी करताना नाबाद ६६ धावांची तुफानी खेळी केली. त्यानंतर गोलंदाजी करतानाही ऑस्टेलियाच्या कर्णधाराची विकेट घेतली. तर क्षेत्ररक्षण करताना भन्नाट झेल घेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.  भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना ३१ व्या षटकांत जाडेजानं अफलातून झेल टिपला. चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव याच्या गोलंदाजीवर कॅमरॉन ग्रीन यांनं भन्नाट स्वीप शॉट मारला. मात्र, चौकार आणि चेंडूच्यामध्ये जाडेजा उभा होता. कॅमरॉन ग्रीनचा चेंडू झेप घेत जाडेजानं उत्कृष्टरित्या पकडला.

कुलदीपच्या या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ग्रीनने मीड-विकेटवर हवेत फटका मारला. चेंडू हवेत उंच गेला नाही. कमी वेळ हवेत राहिल्यावर चेंडू जमिनीवर पडतच होता, तेवढ्यातच जडेजा धावत आला आणि डाइव्ह मारत जबरदस्त झेल टिपला.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात जाडेजानं अष्टपैलू खेळीनं भारतीय यांची मने जिंकली आहेत. प्रथम फलंदाजी करताना जाडेजानं ५० चेंडूत ६६ धावांची विस्फोटक खेळी केली. जाडेजानं हार्दिक पांड्याला साथ देत भारताला ३०० धावांचा टप्पा पार करुण देण्यात मोलाचा वाटा उचलला. जाडेजा आणि हार्दिक पांड्या यांच्यात सहाव्या गड्यासाठी नाबाद १५० धावांची भागिदारी झाली.