हार्दिक पांड्याच्या स्फोटक फलंदाजी पाहून पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरही प्रभावीत झाला आहे. शोएब अख्तरनं हार्दिक पांड्याचं कौतुक करत असतानाचा मोलाचा सल्लाही दिला आहे. शोएब अख्तरनं यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यानं पांड्याचं कौतुक करत त्याला सल्लाही दिला आहे.

हार्दिक पंड्या हा विस्फोटक फलंदाज आहे. त्यानं माध्यमांसमोर बोलताना सांभाळून बोलावं. ‘कॉफी विथ करण’ या टीव्ही शोमध्ये केलेल्या वक्तव्याप्रमाणे भाष्य करून ब्रँड मूल्य आणि विश्वासार्हता खराब करू नये. हार्दिक पांड्या प्रतिभाशाली क्रिकेटपटू आहे. मॅक्सवेल आणि पांड्या एकसारखेच खेळाडू आहे. दोन्ही खेळाडू सेट होऊनच मैदानात येतात अन् फटकेबाजी करतात. सामन्याचं चत्र पालण्याची क्षमता हार्दिक पांड्यामध्ये आहे, असं अख्तर आपल्या व्हिडीओत म्हणाला.

आयपीएलनंतर भरातीय संघ टी-२० मालिका आधी खेळला असता अन् त्यानंतर एकदिवसीय मालिका असती तर भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा वन-डे सामन्यातही ३-० ने पराभव केला असता. वनडे मालिकेचे आयोजन आधी करण्यात आले आणि भारतीय संघाची लय तुटली, हे दुर्दैव आहे, असेही अख्तर म्हणाला.