27 January 2021

News Flash

वसीम जाफरचा फ्री हीट… ‘गँग्स ऑफ वासेपूर स्टाइल’मध्ये इंग्लंडच्या खेळाडूला केलं ट्रोल

विजय भारताचा पण ट्रोल...

भारतीय संघानं एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर सर्वच स्तारातून त्यांच्यावर टीकेची झोड उडाली होती. मात्र, भारतीय संघानं टी-२० मालिकेत विजय संपादन करुन सव्यज परफेड केली आहे. भारतीय संघानं तीन सामन्याच्या टी-२० मालिकेत २-० नं आघाडी घेतली आहे. हार्दिक पांड्याच्या तुफानी फलंदाजीनंतर भारतीय संघानं दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा गड्यांनी पराभव केला होता. भारतीय संघाच्या मालिका विजयानंतर सर्वच स्तारातून भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यामध्ये मराठमोळ्या वसीम जाफरही सामील झाला आहे. जाफर आपल्या विनेदी मीम्समुळे नेहमीच चर्चेत असतो. भारताच्या विजयानंतरही जाफरनं मीम्स ट्विट करत इंग्लंडच्या खेळाडूला ट्रोल केलं आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडिया खराब कामगिरीनंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने, यंदाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया सर्व मालिकांमध्ये पराभूत होईल असा दावा केला होता. मायकल वॉन यानं तेव्हा ट्विट करत आपलं मत मांडलं होतं. आता भारतीय संघानं विजय मिळवल्यानंतर मायकल वॉनच्या ट्विटला रिप्लाय करत जाफरनं त्याला ट्रोल केलं आहे.

भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि पंजाब संघाचा कोच वसीम जाफरनं गँग्स ऑफ वासेपूरच्या या चित्रपटातील एक मिम्स शेअर केलं आहे. या मिम्समधून भारत जिंकला असल्याचं मायकल वॉनला सांगत ट्रोल केलं आहे. जाफरशिवाय इतर भारतीय नेटकऱ्यांनीही इंग्लंडच्या मायकल वॉनला ट्रोल केलं आहे.

दुसऱ्या सामन्यात भारताचा विजय –

ऑस्ट्रेलियाच्या संघाला त्यांच्यात मैदानात मात देत भारताने दुसरा टी२० सामना जिंकला आणि मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली. कर्णधार मॅथ्यू वेडच्या तुफानी ५८ धावा आणि त्याला स्टीव्ह स्मिथने (४६) दिलेली साथ यांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने १९४ धावांची धावसंख्या उभारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवनचं अर्धशतक (५२) आणि हार्दिक पांड्याच्या धडाकेबाज नाबाद ४२ धावांच्या जोरावर भारतीय संघाने सामना ६ गडी राखून जिंकला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2020 9:06 am

Web Title: india vs australia india tour australia wasim jaffar englad nck 90
Next Stories
1 Video: …अन् ऑस्ट्रेलियन विकेटकीपरलाच झाली धोनीची आठवण, म्हणाला, “मी धोनी इतका…”
2 पांड्याची फलंदाजी पाहून ऑस्ट्रेलियाला आठवला धोनी
3 भारताच्या विजयावर रोहितची प्रतिक्रिया, म्हणाला…
Just Now!
X