News Flash

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला ऑस्ट्रेलियातही पाठिंबा, पाहा व्हिडीओ

मेलबर्न मैदानावर भारतीयांची पोस्टबाजी

राजधानी दिल्ली येथे सुर असलेल्या शेतकरी आंदोलनाची लाट आता ऑस्ट्रेलियातही पोहचली आहे. पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी आंदोलनाचे पडसाद भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान दिसून आले आहेत. मेलबर्नच्या मैदानाबाहेर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना शेकडो लोक पाहायला मिळाले.

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंट बाहेर कृषी कायद्याविरोधात शेतकर्‍यांना पाठींबा देत अनेक भारतीयांनी पोस्टरबाजी केली. ऑस्ट्रेलियन पत्रकार पीटर लालोर यांनी आंदोलनाचा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये शेकडो शेतकी आंदोलनात सहभागी झाल्याचं दिसत आहे. अनेकांच्या हातात दिल्लीतील शेतकरी आंदोलना पाठिबा दिल्याचे पोस्टर्स दिसत होते.

मेलबर्न मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान दुसरा कसोटी सामना सुरु आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र बुमराह, सिराज आणि अश्विनच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर संपुष्टात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 11:47 am

Web Title: india vs australia indian farm protest outside mcg india tour australia nck 90
Next Stories
1 Ind vs Aus : कांगारुंची पहिल्या डावात १९५ पर्यंत मजल, बुमराह-आश्विनचा भेदक मारा
2 मोहम्मद सिराजचं दणक्यात पदार्पण, कांगारुंनी टेकले गुडघे
3 विराट कोहली नाही बुमराह ठरला २०२० मध्ये सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू
Just Now!
X