भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या मैदानावरील आक्रमक वृत्तीची क्रिकेट गरज नाही, आक्रमक वृत्तीमुळे खेळची आणि विशेषतः स्वत विराटाची प्रतिमा डागाळत आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलर यांनी व्यक्त केले आहे. विराट कोहीलची मैदानाबाहेरील वर्तणूक खूपच प्रशंसनीय असल्याचेही ते म्हणाले.

‘पर्थ कसोटीमध्ये विराट कोहलीने गरज नसताना टीम पेनला लक्ष्य केले. बाचाबाची आणि स्लेजिंग करत त्याने सामन्याला वेगळेच वळण दिले, असे मार्क टेलर म्हणाला.’ पुढे बोलताना तो म्हणाला, ‘विराट कोहली या वागणुकीची मला चिंता आहे. तो एक उत्तम फलंदाज असून कर्णधार म्हणूनही चांगल्या प्रकारे संघाला पुढे घेऊन जात आहे. विरोधी संघाचे फलंदाज बाद झाल्यावर देखील त्याचा आक्रमक जल्लोष मला खटकला असे करून तुम्ही संघाचे मनोबल वाढवू शकत नाही, असेही तो म्हणाला.’

‘चार वर्षांपूर्वी जेव्हा चॅनेल नाईन वर क्रिकेट असायचे त्यावेळी मी विराटची मुलाखत घेण्यासाठी गेलो आणि विराटच्या मैदानाबाहेरील चांगल्या स्वभावाचा एक पैलू पहिला आहे. त्याने मला काही विशेष सांगितले नाही परंतु त्याने ज्याप्रकारे स्वतःला समोर ठेवले त्यामुळे मी त्याची प्रशंसा करत असल्याचेही टेलर म्हणाला.’