ब्रिस्ने येथे सुरु असलेल्या निर्णायक कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजने भेदक मारा केला. त्याने दुसऱ्या डावात २० षटकांत ७३ धावांच्या मोबदल्यात पाच बळी मिळवले. मार्नस लाबूशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड असे पाच बळी त्याने टिपले. ऑस्ट्रेलियाचा डाव आटोपल्यानंतर सिराज पॅव्हेलियनकडे जात असताना त्याला जादूची झप्पी मिळाली.

बीसीसीआयनं एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये सिराज पॅव्हेलिअनमध्ये परतत असताना सर्व सहकारी टाळ्या वाजवून त्याच्या कामगिरीला दाद देत आहेत. बुमराहनं तर सिराजला मिठी मारत शब्बासकी दिली. बुमराहनं मिठी मारल्यानंतर सिराजच्या चेहऱ्यावर चमक आणि आनंद दिसून येत होता. बुमराहनं युवा सिराजला या दौऱ्यात खूपवेळा मार्गदर्शन केलं आहे. तसेच दोघांनाही वर्णद्वेषी टिप्पीचा सामनाही करावा लागला होता. सिराजनं अनुभवी बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या वेगवान माऱ्याचं नेतृत्व यशस्वीपणे पार पाडलं. युवा खेळाडूच्या कामगिरीनं सर्वजण प्रभावित झाले आहेत.

आणखी वाचा- सिराजचा ऑस्ट्रेलियाला ‘पंच’; जहीरच्या विक्रमाची केली बरोबरी

बॉर्डर-गावसकर मालिकेत मोहम्मद सिराज भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाल्यानंतर सिराजला दुसऱ्या कसोटीत संधी देण्यात आली होती. सिराजनं सहा डावांत १३ विकेट घेतल्या आहेत. अश्विनच्या नावावर १२ तर बुमराहच्या नावावर ११ विकेट आहेत. या मालिकेत पाच विकेट घेण्याचा कारनामा भारताकडून फक्त मोहम्मद सिरजानं केला आहे.

पाहा व्हिडीओ –

आणखी वाचा- ‘सुंदर’ खेळीनं त्यानं कोट्यावधी चाहत्यांची मन जिंकली मात्र वडील म्हणतात…

३० वर्षांपूर्वीचा विक्रमही काढला मोडीत –
ऑस्ट्रेलियात पदार्पणात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम आता मोहम्मद सिराजच्या नावावर जमा झाला आहे. याआधी हा विक्रम जवागल श्रीनाथ याच्या नावावर होता. श्रीनाथनं १९९१-९२ मध्ये ऑस्ट्रेलियात भारताकडून पदार्पण करताना १० विकेट घेतल्या होत्या.

आणखी वाचा- सिराजचा ऑस्ट्रेलियाला ‘पंच’; टीम इंडियापुढे विजयासाठी ३२८ धावांचं आव्हान

जहीर, बिशनसिंग यांची बरोबरी –
ब्रिस्बेनच्या मैदानावर तब्बल २००३ नंतर भारतीय गोलंदाजानं पाच विकेट घेण्याचा कारनामा केला आहे. याआधी २००३ मध्ये जहीर खान यानं या मैदानावर पाच विकेट घेतल्या होत्या. इरापल्ली प्रसन्ना यांनी सर्वात आधी पाच विकेट घेण्याचा कारनामा केला होता. इरापल्ली यांनी १९६८ मध्ये हा कारनामा केला होता. त्यानंतर १९७७ मध्ये मदनलाल आणि बिशनसिंग बेदी यांनी प्रत्येकी पाच विकेट घेतल्या होत्या. १९७७ नंतर २००३ मध्ये जहीर खान यानं या मैदानावर पाच विकेट घेतल्या होत्या.