भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं तिसऱ्या टी-२० सामन्यात अर्धशतकी खेळी केली आहे. कोहलीनं संयमी फलंदाजी करत ४१ चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे. विराट कोहलीचं टी-२० क्रिकेटमधील हे २५ वं अर्धशतक आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकं विराट कोहलीच्या नावावर जमा झाली आहेत.

टी-२० मध्ये सर्वाधिक २५ अर्धशतकं विराट कोहलीच्या नावावर आहेत. विराट कोहलीनं रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माच्या नावावर २१ अर्धशतकांची नोंद आहे. तिसऱ्या क्रमांकावर डेविड वॉर्नर असून त्याच्या नावावर १९ अर्धशतकं आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीचं हे सतरावं अर्धशतक आहे. धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक अर्धशतकाची नोंद विराट कोहलीच्या नावावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या वॉर्नरच्या नावावर १२ अर्धशतक आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रोहित शर्माच्या नावावर १० अर्धशतक आहेत.

विराट कोहलीनं तिसऱ्या टी-२० सामन्यात तीन चौकारांच्या मदतीनं अर्धशतकी खेळी केली. एका बाजूला विराट कोहली संयमी फलंदाजी करत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला एकही फलंदाज स्थिरवत नाही. शिखर, राहुल, संजू, आणि श्रेअस अय्यर यांना मोठी खेळी करण्यात अपयश आलं आहे. ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करत २० षटकांत १८६ धावा केल्या आहेत. भारतीय संघ १८७ धावांच्या लक्षाचा पाठलाग करत आहे.