भारतीय युवा वेगवान गोलंदाज टी-नटराजन यांनं देशासाठी पहिली मालिका जिंकणं संस्मरणीय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. नटराजनं यानं ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एकदिवसीय मालिकेत २-१ नं पराभवाला सामोरं जाण्याऱ्या भारतीय संघानं टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियावर २-० नं आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना आज, मंगळवारी ८ डिसेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे. पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघानं निर्वादित वर्चस्व गाजवलं. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. या विजयासह भारतीय संघानं टी-२० मालिकेत विजय मिळवला आहे. या विजयात युवा खेळाडू टी-नटराजन याचा मोलाचा वाटा आहे. नटराजन यानं पहिल्या सामन्यात ३ तर दुसऱ्या सामन्यात दोन बळी घेतले. मालिका विजय झाल्यानंतर युवा नटराजन यानं ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करताना टी-२० मालिका जिंकणे संस्मरणीय व विशेष आहे, असं ट्विट भारताचा वेगवान गोलंदाज टी. नटराजनने केलं आहे. नटराजनने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले, ‘माझा देशासाठी हा पहिला मालिका विजय आहे. संस्मरणीय व व विशेष.’
First series win for my country
Meorable and special #TeamIndia pic.twitter.com/18YBdW43cd— Natarajan (@Natarajan_91) December 7, 2020
दुसऱ्या टी-२० सामन्यात नटराजनने डार्सी शॉर्ट व मोएजेस हेनरिक्स यांना बाद केले. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज ग्लेन मॅक्ग्राही नटराजनच्या कामगिरीमुळे प्रभावित झाला. नटराजन भारतासाठी या दौऱ्याचा शोध असल्याचे मॅकग्राने म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 8, 2020 9:34 am