भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यादरम्यान चार कसोटी सामन्याच्या मालिकेला उद्या, १७ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. भारतीय संघ गेल्यावर्षीचा विजयाची पुनरावत्ती करण्यासाठी मैदानात उतरेल तर ऑस्ट्रेलियचा संघ पराभवाचा वचपा काढण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार आहे. भारतीय संघातील सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ सध्या खराब फॉर्मातून जात आहे. आयपीएलमध्ये अपयशी ठरल्यानंतर ऑस्ट्रेलियात झालेल्या पहिल्या दोन्ही सराव सामन्यातही शॉ धावा काढण्यात अपयशी ठरला आहे. दुसऱ्या सराव सामन्यात फलंदाजीत फ्लॉप ठरणाऱ्या पृथ्वी शॉनं गोलंदाजीत कमाल दाखवली आहे. अनिर्णित राहिलेल्या या सामन्यात पृथ्वी शॉनं टाकेलेला चेंडू फलंदाज आणि यष्टीरक्षक यांनाही समजला नाही…. पृथ्वीच्या या मिस्ट्री चेंडूची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे…

पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वी शॉला अंतिम ११ मध्ये संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. दोन्ही सराव सामन्यात छाप पाडण्यात अपयशी ठरणाऱ्या पृथ्वी शॉनं टाकलेल्या लेग ब्रेक चेंडूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दुसऱ्या सराव सामन्यात पृथ्वीनं तीन षटकं टाकली होती. यातील तिसऱ्या षटाकात त्यानं हा चेंडू टाकला. पृथ्वीनं टाकलेला हा चेंडू यष्टीरक्षक वृद्धिमान साहासोबत सर्वांना चकवत, मागे गेला. कामचलाऊ गोलंदाजी करणार्‍या पृथ्वीने हा ‘ड्रीम बॉल’ टाकत, सर्वांना आवाक् केले. लेग स्टंपवर फेकलेला हा चेंडू फलंदाज जॅक विल्डरमथपासून दूर जात, स्लीपमध्ये उभ्या असलेल्या कर्णधार अजिंक्य रहाणे आणि यष्टीरक्षक साहाच्या हाताला न लागता थर्डमॅनच्या दिशेने गेला. पृथ्वीनं याचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

पाहा व्हिडीओ –

 

 
 
 
Instagram वर ही पोस्ट पहा
 
 
 

 

PRITHVI SHAW (@prithvishaw) ने सामायिक केलेली पोस्ट

१७ डिसेंबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पृथ्वी शॉ, मयांक अगरवाल, शुभमन गिल आणि के. एल राहुल यांच्यामध्ये सलामीसाठी दोघांची निवड केली जाणार आहे.