17 January 2021

News Flash

भारताला मोठा झटका, रविंद्र जाडेजा चौथ्या कसोटीला मुकण्याची शक्यता

ग्लोव्हज घालून फलंदाजी करणे त्याच्यासाठी खूप कठिण

सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला दुखापतींचा मोठा फटका बसला आहे. भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जाडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे ब्रिस्बेनमध्ये १५ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्यात त्याच्या खेळण्याची शक्यता धूसर आहे.

ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाचे शॉर्ट चेंडू खेळताना जाडेजाला ही दुखापत झाली. लगेच त्याच्या अंगठ्याचे स्कॅनिंग करण्यात आले. “रविंद्र जाडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर आहे. ग्लोव्हज घालून फलंदाजी करणे त्याच्यासाठी खूप कठिण आहे” असे बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआयला सांगितले. पुढचे दोन ते तीन आठवडे तो खेळू शकणार नाही. त्यामुळे अंतिम कसोटी सामन्यात त्याच्या समावेशाची शक्यता मावळते.

जाडेजाच्या २८ धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १०० पेक्षा कमी धावांची आघाडी मिळाली. मिचेल स्टार्कच्या शॉर्ट चेंडू त्याच्या डाव्या अंगठ्यावर बसला. त्याला तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज लागली. रविंद्र जाडेजाचे संघाबाहेर जाणे भारतासाठी एक झटका आहे. कारण या दौऱ्यात तो प्रचंड फॉर्ममध्ये आहे. बॅट आणि चेंडूनेही त्याने कमाल दाखवली आहे. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात चार विकेट घेऊन त्याने ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2021 7:40 pm

Web Title: india vs australia ravindra jadeja sustains thumb fracture rare chances to play in fourth test dmp 82
Next Stories
1 IND vs AUS: ऑस्ट्रेलियन कर्णधाराचा पंचांशी वाद; निर्णय न पटल्याने शिवीगाळ
2 सिडनी कसोटीला गालबोट; मोहम्मद सिराजबद्दल वर्णद्वेषी शेरेबाजी
3 चेतेश्वर पूजारा इतका संथ खेळू शकत नाही, प्रग्यान ओझाची टीका
Just Now!
X