चौथ्या कसोटीतील अखेरच्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ऋषभ पंतनं २३ धावांची छोटेखानी खेळी केली. यासह आतंरराष्ट्रीय कसोटी सामन्यात ऋषभ पंतच्या नावावर ९९९ धावा झाल्या आहेत. कसोटीमध्ये एक हजार धावा करण्यासाठी एका धावेची गरज असतानाच ऋषभ पंत बाद झाला. त्यामुळे धोनीच्या नावावरील विक्रम अद्याप अबाधितच आहे.

कसोटी सामन्यात सर्वाधिक वेगवान एक हजार धावा करणाऱ्या यष्टीरक्षकाचा विक्रम माजी कर्णधार धोनीच्या नावावर आहे. धोनीनं ३२ डावांत कसोटीमध्ये १००० धावा केल्या. धोनीनं माजी यष्टीरक्षक फारुख इंजिनिअरचा विक्रम मोडीत काढला होता. फारुख इंजिनिअरनं ३६ डावांत एक हजार धावा केल्या आहेत. ब्रिस्बेनमध्ये २३ धावांवर बाद होणाऱ्या पंतनं २६ डावांत ९९९ धावा चोपल्या आहेत. १००० कसोटी धावा पूर्ण करण्यासाठी पंतला फक्त एका धावेची गरज आहे. पुढील डावात एक धाव काढल्यानंतर पंत धोनीचा विक्रम मोडीत काढू शकतो.

ऋषभ पंत २३ धावांवर बाद झाल्यामुळे लागोपाठ ११ डावांत २५ पेक्षा जास्त धावा करण्यापासून वचिंत राहिला आहे. पंतनं ऑस्ट्रेलियात लागोपाठ १० डावांत २५ किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियात लागोपाठ १० डावांत २५ किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम फक्त ऋषभ पंतच्या नावावर आहे.