अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय संघानं आश्वासक सुरुवात केली आहे. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिल्या सत्राअखेरीस कांगारुंच्या संघानं तीन विकेट गमावल्या आणि फक्त ६५ धावांपर्यंत मजल मारु शकला. अश्निनने दोन आणि बुमराहनं एक विकेट घेतली. अश्विनने धोकादायक स्मिथ आणि मॅथ्यू वेड यांना बाद केलं. अश्विनच्या विकेटमध्ये यष्टीरक्षक पंतचा सल्ला महत्वाचा ठरला.

यष्टीमागून पंतने दिलेल्या सल्ल्यामुळे अश्विनने धोकादायक ठरत असलेल्या मॅथ्यू वेडला माघारी झाडलं.वेड ३० धावा काढून बाद झाला. अश्विनच्या गोलंदाजीवर वेडनं स्वीप शॉट मारला. त्यानंतर पंतनं अश्विनला मोलाचा सल्ला दिला. पंतनं सांगितल्याप्रमाणेच अश्विननं चेंडू टाकला अन् वेड जाळ्यात अडकला. यष्टीमागून पंतनं ‘अंदर ही रखना… ये उपर मारेगा’ असा सल्ला दिला होता. त्यानुसार अश्विनेनं चेंडू फेकला.

पाहा व्हिडीओ –

मेथ्यू वेडनं मारलेला हा चेंडू हवेत गेला. झेल घेण्यासाठी रविंद्र जाडेजा आणि शुबमन गिल धावले होते. हा झेल घेताना दोघांची टक्कर होता होता थोडक्यात वाचली. जाडेजानं चपळाईन झेल घेत वेडला माघारी पाठवलं.