28 November 2020

News Flash

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहितने कंबर कसली, NCA मध्ये सरावाला सुरुवात

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहितला कसोटी संघात स्थान

भारतीय संघाच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्माने कंबर कसली आहे. आयपीएलदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे रोहित शर्माची भारताच्या टी-२० आणि वन-डे संघात निवड झालेली नाही. रोहित शर्मा कसोटी मालिकेत सहभागी होणार आहे. विराट कोहली पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर पत्नी अनुष्काची बाळंतपणात काळजी घेण्यासाठी भारतात परतणार आहे. त्याआधी रोहितने आपल्या फिटनेसवर लक्ष देण्यासाठी NCA मध्ये सरावाला सुरुवात केली आहे.

अवश्य वाचा – ऑस्ट्रेलियात रोहितने स्वतःला सिद्ध केलं तर कर्णधारपद विभागण्याची चर्चा अजून जोर धरेल – शोएब अख्तर

पंजाबविरुद्ध सामन्यात रोहितचे पायाचे स्नायू दुखावले होते. या कारणासाठी निवड समितीने त्याला संघात स्थान दिलं नाही. परंतू यानंतर रोहितने हैदराबादविरुद्ध सामन्यातून पुनरागमन केलं. इतकच नव्हे तर रोहितने अंतिम सामन्यात संघाचं नेतृत्व करताना अर्धशतकी खेळी केली. परंतू बीसीसीआयच्या मते त्याला आपल्या दुखापतीमधून सावरण्यासाठी आणखी थोडावेळ देणं गरजेचं आहे. यासाठीच सर्व भारतीय खेळाडू सध्या ऑस्ट्रेलियात सराव करत असताना रोहित NCA मध्ये आपल्या तंदुरुस्तीवर काम करतो आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 4:24 pm

Web Title: india vs australia rohit sharma begins fitness training at nca psd 91
Next Stories
1 साक्षी धोनीच्या वाढदिवसाचं दुबईत जंगी सेलिब्रेशन, फोटो व्हायरल
2 ऑस्ट्रेलियात रोहितने स्वतःला सिद्ध केलं तर कर्णधारपद विभागण्याची चर्चा अजून जोर धरेल – शोएब अख्तर
3 IND vs AUS: संजय मांजरेकर यांचं ‘कमबॅक’; ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कॉमेंट्री पॅनलमध्ये समावेश
Just Now!
X