08 March 2021

News Flash

Super Sanju : सॅमसनचं अफलातून क्षेत्ररक्षण; पाहा व्हिडीओ

विश्वास बसणार नाही...

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघातील खेळाडू गचाळ क्षेत्ररक्षण करत असताना दिसत आहे. संघातील अनेक खेळाडूंनी झेल तर सोडलेच शिवाय अनेक धावा बहाल केल्या. मर्यादित षटकांच्या सामन्यात खेळाडूंनी सोपे झेल सोडत जिवनदान दिलं आहे. खेळाडू गचाळ क्षेत्ररक्षण करत असनाच संजू सॅमसन यानं अफलातून षटकार आढवत सहकाऱ्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.

मॅक्सवेलनं चहलाच्या षटकातील एक चेंडू जोरात फटकावला. सर्वांनाच हा चेंडू ऑस्ट्रेलियाला सहा धावा देऊन जाणार असं वाटत होतं. मात्र, षटकार आणि चेंडूच्यामध्ये संजू सॅमसन उभा होता. संजूनं हवेत झेपावत षटकार रोखला. योग्यवेळी हवेत झेपवत चेंडू पकडला अन् सोडलाही. संजूनं संघासाठी पाच धावा वाचवल्या. संजूनं आढवलेला चेंडू पाहून मॅक्सवेलही चकीत झाला होता..

संजूच्या अफलातून क्षेत्ररक्षणाबाबात आयसीसीनेही ट्विट केलं आहे. Super Sanju असं ट्विट कर आयसीसीनं संजूचा फोटो पोस्ट केला आहे.

पाहा संजूच्या अफलातून क्षेत्ररक्षणाचा व्हिडीओ

संजू सॅमसन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. त्याच्या क्षेत्ररक्षणाचं कौतुक होतं आहे. दरम्यान, भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाला १८६ धावांवर रोखलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 3:32 pm

Web Title: india vs australia sanju samson today match brilliant fielding india tour australia nck 90
Next Stories
1 ‘विरुष्का’च्या या फोटोने ट्विटरवर घातला धुमाकूळ, मोडले सर्व विक्रम
2 …म्हणून जाडेजाऐवजी चहलला संधी देण्यात आली ! जाणून घ्या पडद्यामागे नेमकं काय घडलं??
3 शामी बाहेर, नटराजनला संधी; सेहवागनं निवडले विश्वचषकासाठी गोलंदाज
Just Now!
X