News Flash

ऑस्ट्रेलियातून परतल्यानंतर शुबमननं यशाचं श्रेय दिल युवराजला; म्हणाला…

शतक हे केकवरच्या चेरीप्रमाणे आहे.

नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अनेक युवा चेहऱ्यांनी आपली छाप उमटवली. त्यापैकीच एक आहे शुबमन गिल. मेलबर्न कसोटीत नॅथन लायनची फिरकी गोलंदाजी असो किंवा गाबामध्ये मिचेल स्टार्कचा भेदक मारा, शुबमनने या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा अत्यंत सहजतेने सामना केला. आज अनेक दिग्गज शुबमनच्या फलंदाजीच्या तंत्राचे कौतुक करत आहेत.

संघाच्या विजयात मोलाचे योगदान देणारा शुबमन म्हणतो की, “आता मी रिलॅक्स आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी पदापर्ण करणे ही माझ्यासाठी दिलासा देणारी बाब आहे. मी आधी बेचैन होतो पण प्रत्येक डावाबरोबर माझा आत्मविश्वास वाढत गेला.”

बॉर्डर-गावसकर मालिकेत सहा डावांमध्ये फलंदाजी करण्याची शुबमनला संधी मिळाली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करताना एकदाही त्याच्या चेहऱ्यावर दबाव दिसला नाही. ब्रिस्बेन कसोटीच्या चौथ्या डावात त्याने केलेली ९१ धावांची खेळी भारताच्या ऐतिहासिक मालिका विजयात महत्त्वाची ठरली.

शतक झळकवण्याची संधी हुकल्याच्या वडिलांच्या मताशी तो सहमत आहे. “शतक हे केकवरच्या चेरीप्रमाणे आहे. मी सेट झालो होतो, त्यामुळे शतक झळकवायला पाहिजे होते. पण त्याचवेळी संघाच्या विजयात योगदान दिल्याचा मला आनंद आहे. शिकण्याच्या दृष्टीने माझ्यासाठी ही खूप मोठी मालिका आहे” असे शुबमनने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.

शुबमनने ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या यशाचे श्रेय युवराज सिंगलाही दिले आहे. आयपीएलच्या आधी २१ दिवसांचे एक शिबीर झाले. त्यात युवराजने शुबमनकडून कसून सराव करुन घेतला. “आयपीएलच्या आधी युवराज सिंग सोबत सराव शिबीरात सहभागी होण्याचा फायदा झाला. या शिबीरात युवराजने वेगवेगळया अँगलमधून शेकडो शॉर्टपीच चेंडू टाकले. त्याचा मला ऑस्ट्रेलियात खूपच फायदा झाला” असे शुबमनने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 11:05 am

Web Title: india vs australia shubman gill give credit to yuvraj singh dmp 82
Next Stories
1 खुलासा: वॉशिंग्टन सुंदरकडे खेळण्यासाठी नव्हते पॅड्स, सामना सुरू झाल्यानंतर गेला दुकानात आणि…
2 लोकलमध्ये सीट मिळवणं, कांगारुंच्या गोलंदाजीचा सामना करण्यापेक्षा अवघड – शार्दुल ठाकूर
3 RCB मध्ये आले दिल्लीचे दोन अष्टपैलू खेळाडू, एकहाती जिंकून देऊ शकतात सामना
Just Now!
X