News Flash

हनुमा विहारीनं क्रिकेटची हत्या केली, भाजपा नेत्याचं ट्विट

विहारी आणि आर. अश्विनने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना यश मिळणार नाही याची काळजी घेतली.

बॉर्डर-गावसकर मालिकेतील सिडनीतील तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राखून भारताने ऑस्ट्रेलियाला विजयापासून रोखलं. ऋषभ पंत ९७ धावांवर बाद झाल्यानंतर हनुमा विहारीने संयमाने फलंदाजी केली व सामना अनिर्णीतावस्थेकडे नेला. खरंतर या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयाची जास्त संधी होती.

पण अखेरीस हनुमा विहारी आणि आर. अश्विनने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना यश मिळणार नाही याची काळजी घेतली. हनुमा विहारीच्या या कामगिरीचे क्रिकेटच्या जाणकारांडून एकाबाजूला कौतुक होत आहे. पण गायक, भाजपा नेता आणि खासदार बाबुल सुप्रियो यांनी मात्र विहारीच्या खेळावर टीका केली आहे.

आणखी वाचा- विहारी-अश्विनने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना रडवलं; सिडनी कसोटी अनिर्णीत

“फक्त सात धावा करण्यासाठी हनुमा विहारी १०९ चेंडू खेळला. हा अत्याचार आहे. हुनमा विहारीने भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या शक्यतेलाच मारले नाही, तर त्याने क्रिकेटची सुद्धा हत्या केली. क्रिकेटमधलं मला काही कळत नाही” असं सुद्धा बाबुल सुप्रियो यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

आणखी वाचा- IND vs AUS: विहारी, अश्विनची धाकड खेळी! ४० वर्षांत पहिल्यांदाच केला ‘हा’ पराक्रम

“हनुमा विहारीने पुढाकार घेऊन खराब चेंडू सीमापार धाडले असते तर भारताने कदाचित ऐतिहासि विजयाची नोंद केली असती” असे बाबुल सुप्रियो म्हणाले. “कोणी अपेक्षा केली नव्हती, ते पंतने करुन दाखवले. हनुमा विहारी खेळपट्टीवर स्थिरावला होता. त्यामुळे त्याने खराब चेंडू सीमापार मारायला पाहिजे होते” असे बाबुल सुप्रियो म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 2:30 pm

Web Title: india vs australia sydney test hanuma vihari murdered cricket babul supriyo dmp 82
Next Stories
1 IND vs AUS: विहारी, अश्विनची धाकड खेळी! ४० वर्षांत पहिल्यांदाच केला ‘हा’ पराक्रम
2 भारतीय फलंदाजांची ऐतिहासिक कामगिरी; कसोटीत पहिल्यांदाच घडली ही गोष्ट
3 Video: अश्विनने केली ऑस्ट्रेलियन कर्णधाराची बोलती बंद!! दिलं भन्नाट उत्तर…
Just Now!
X