ऑस्ट्रेलियाला ३६९ धावांवर रोखल्यानंतर भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. युवा शुबमन गिलला कमिन्सनं सुरेख चेंडूवर स्वस्तात माघारी पाठवलं. दुसरीकडे रोहित शर्मा स्थारवला होता. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाचा समाचार घेत असतानाच नॅथन लायनच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारुन रोहित शर्मा बाद झाला. रोहित शर्मानं ६ चौकारांच्या मदतीन ४४ धावांची खेळी केली. रोहित आणि शुबमन गिल बाद झाल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी संयमी फलंदाजी करत भारतीय संघाचा डाव सावरला. चहापनापर्यंत भारतीय संघानं दोन गड्यांच्या मोबदतल्या ६२ धावा केल्या आहेत.

दुसऱ्या सत्रात भारतीय संघानं २६ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात ६२ धावा केल्या आहे. भारतीय संघ पहिल्या डावात अद्याप ३०७ धावांनी पिछाडीवर आहे. पुजारा-रहाणे जोडीनं भारीय संघाची आणखी पडझड होऊ दिली नाही. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी ३७ चेंडूचा सामना केला. पुजारा ८ आणि रहाणे २ धावांवर खेळत आहेत.


भारतीय संघाच्या युवा गोलंदाजांनी आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला ३६९ धावांवर रोखलं. ऑस्ट्रेलियाकडून लाबुशेन यानं १०८ तर कर्णधार टिम पेन यानं ५० धावांची महत्वपूर्ण खेळी केली. भारतीय संघाकडून नटराजन, सुंदर आणि शार्दुल यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले. तर मोहम्मद सिरजला एक विकेट मिळाली.