01 March 2021

News Flash

पुकोव्हस्की,लाबूशेनची दमदार अर्धशतकं; पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया दोन बाद १६६ धावा

स्मिथचीही आश्वसक खेळी

मार्नस लाबुशेन (६७*) आणि विल पुकोव्हस्की (६२)यांनी ठोकलेल्या दमदार अर्धशतकी खेळीच्या बळावर पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियानं वर्चस्व राखलं आहे. पहिल्या दिवासाखेर ऑस्ट्रेलियानं दोन गड्यांच्या मोबदल्यात १६६ धावा केल्या आहेत. दिवसाखेर लाबुशेन (६७) आणि स्मिथ (३०) नाबाद आहेत. भारतीय संघाकडून सिराज आणि सैनी यांना प्रत्येकी एक एक विकेट घेण्यात यश मिळालं. सात षटकानंतर पावसाचा व्यत्यय आल्यामुळे सामना थांबवण्यात आला होता. त्यामुळे पहिल्या दिवशी ५५ षटकांचा सामना खेळवण्यात आला.

दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला सिराजनं पाच धावांवर माघारी धाडलं. त्यानंतर भारतीय संघ सामन्यात वरचढ होणार असं वाटलं होतं. मात्र, पदार्पण करणाऱ्या पुकोव्हस्कीनं संयमी फलंदाजी केली. पुकोव्हस्कीला लाबुशेन यानं उत्तम साथ दिली. पुकोव्हस्की-लाबुशेन यांनी दुसऱ्या गड्यासाठी १०० धावांची भागिदारी केली. अखेर पदार्पण करणाऱ्या सैनीनं पुकोव्हस्कीला पायचीत करत ही जोडी फोडली. पुकोव्हस्कीनं ६२ धावांची खेळी केली.

आणखी वाचा- Video: ऋषभ पंतच्या ‘त्या’ कृतीमुळे अश्विनला राग अनावर

पुकोव्हस्की बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या स्मिथनं लाबुशेनबरोबर संथ असेली धावसंख्या वाढवली. एकदिवसीय सामन्याप्रमाणे दोघांनी फटकेबाजी केली. पुकोव्हस्की बाद झाल्यानंतर लाबुशेन यानं सामन्याची सुत्रं आपल्याकडे घेतली. लाबुशेन यानं कारकीर्दीतील नववे अर्धशतकं झळकावलं. स्मिथनं त्याला चांगली साथ दिली. स्मिथ आणि लाबुशेन यांनी तिसऱ्या गड्यासाठी ६० धावांची नाबाद धावांची भागिदारी करत ऑस्ट्रेलियाची स्थिती आणखी मजबूत केली आहे.

आणखी वाचा- याला म्हणतात दरारा… भारतीय गोलंदाजांमुळे ३५ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला घ्यावा लागला ‘तो’ निर्णय

भारताकडून सिराज-सैनीचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला बळी घेण्यात यश आलं नाही. बुमराह, अश्विन आणि जाडेजाची पाटी दिवसाखेर कोरीच राहिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2021 1:20 pm

Web Title: india vs australia third test first day marnus labuschagne will pucovski india tour australia nck 90
Next Stories
1 Video: झेल टिपण्यासाठी ऋषभ पंतने घेतली हवेत उडी अन्…
2 IND vs AUS : लाबुशेन-पुकोव्हस्कीनं डाव सावरला; चहापानापर्यंत ऑस्ट्रेलिया एक बाद ९३
3 Video: ऋषभ पंतच्या ‘त्या’ कृतीमुळे अश्विनला राग अनावर
Just Now!
X