21 January 2021

News Flash

विराट म्हणाला, त्या शॉटबद्दल मी एबीशी चर्चा करेन; अन् एबीने दिला ‘हा’ रिप्लाय

विराट कोहलीचा खणखणीच षटकार

भारतीय संघानं दुसऱ्या टी-२० सामन्यात सहा गड्यांनी मात करत ऑस्ट्रेलिचा पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघानं तीन सामन्याची मालिकेत २-० नं आघाडी घेतली आहे. विराट कोहली, शिखर धवन, हार्दिक पांड्या आणि नटराजन यांच्या कामगिरीच्या बळावर भारतीय संघानं विजयी मालिका कायम ठेवली. १९५ धावांच्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना कर्णधार कोहलीनं एक अन-ऑर्थोडोक्स स्कूप शॉट लावून सहा धावा वसूल केल्या होत्या. तो फटका मारताना तुम्ही एबी डिव्हिलियर्स खूप वेळा पाहिलं असेल. आयपीएलमध्ये तर एबीचा हा फटका पाहून अनेकदा आपण मंत्रमुग्ध झालो असेल.

सामन्यानंतर या स्कूप शॉटबद्दल विचारलं असता विराट कोहलीला म्हणाला की, ‘या शॉटचा फोटो एबीला पाठवतो आणि त्याची प्रतिक्रिया विचारेन.’ विराट कोहलीच्या अन-ऑर्थोडोक्स स्कूप शॉटचा व्हिडीओ क्रिकेट ऑस्ट्रेलियानं आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी विराट की एबी ? असा प्रश्न विचारला आहे.

(आणखी वाचा : कोहलीनं असा षटकार मारलेला कधी पाहिला का? पाहा व्हिडीओ )

विराट कोहलीच्या या अन-ऑर्थोडोक्स स्कूप शॉटवर डिव्हिलिअर्सनं प्रतिक्रिया दिली आहे. विस्डन इंडियाच्या सोशल मीडियावरील विराट कोहलीचा अन-ऑर्थोडोक्स स्कूप शॉट पोस्ट करण्यात आला होता. यावर डिव्हिलिअर्सनं रिप्लाय दिला आहे. त्यानं विराट कोहलीच्या या शॉटचं कौतुक कर हसण्याची इमोजी पोस्ट केली आहे.

रोहित बुमराहच्या अनुपस्थितीत यश – विराट –
रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यासांरख्या प्रमुख खेळाडूंशिवाय खेळतानाही ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीत टी-२० मालिकेत धूळ चारल्यामुळे मी आनंदित आहे, असे भारताचा कर्णधार विराट कोहलीनं सामन्यानंतर सांगितलं. ” टी-२० मालिकेत संघ बांधणी योग्य प्रकारे जुळून आली आहे. विशेष म्हणजे रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांसारखे आमचे मर्यादित षटकांच्या सामन्यातील प्रमुख खेळाडू या मालिकेत संघाचा भाग नव्हते. तरीही ऑस्ट्रलियाला पराभूत केल्यामुळे मी समाधानी आहे, असं कोहली म्हणाला.’ हार्दिक आता एक परिपक्व खेळाडू म्हणून उद्यास आला आहे. त्यानं सामाना जिंकवूनच पॅव्हेलियनमध्ये परतावे, अशी अपेक्षा संघाला आहे. त्यामुळे ही खेळी त्याला स्वत:लाही सुखावणारी असेल, याची मला खात्री आहे. त्याशिवाय नटराजनच्या समावेशामुळे गोलंदाजीत विविधता निर्माण झाली आहे, असेही कोहलीनं सांगितलं.

आणखी वाचा :

पांड्याची फलंदाजी पाहून ऑस्ट्रेलियाला आठवला धोनी

भारताच्या विजयावर रोहितची प्रतिक्रिया, म्हणाला…

पांड्या म्हणतो, “सामनावीरचा खरा मानकरी मी नाही, तर…”

रोहित-बुमराहशिवाय भारतानं टी-२० मालिका जिंकली, पाहा विराट कोहली काय म्हणाला…

वसीम जाफरचा फ्री हीट… ‘गँग्स ऑफ वासेपूर स्टाइल’मध्ये इंग्लंडच्या खेळाडूला केलं ट्रोल

विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये कट झाले तीन केक; पाहा व्हिडीओ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2020 10:42 am

Web Title: india vs australia virat kohali ab bcci india tour australia nck 90
Next Stories
1 विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये कट झाले तीन केक; पाहा व्हिडीओ
2 पांड्या म्हणतो, “सामनावीरचा खरा मानकरी मी नाही, तर…”
3 वसीम जाफरचा फ्री हीट… ‘गँग्स ऑफ वासेपूर स्टाइल’मध्ये इंग्लंडच्या खेळाडूला केलं ट्रोल
Just Now!
X