भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं तिसऱ्या टी-२० सामन्यात संयमी अर्धशतक झळकावलं. विराट कोहलीनं ४१ चेंडूत अर्धशतकी खेळी केली. तिसऱ्या टी-२० सामन्यात विराट कोहलीने एक खास विक्रम केला आहे. कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये ३०० षटकारांचा टप्पा पूर्ण केला आहे. अशी कामगिरी करणारा विराट चौथा खेळाडू ठरला आहे.
तिसऱ्या सामन्यात विराट कोहलीनं १६ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर खणखणीत षटकार लगावला. या षटकारासह विराट कोहलीच्या नावावर ३०० षटकारांची नोंद झाली आहे. विराटने आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात ७९ षटकार मारले आहेत.
या यादीत हिटमॅन रोहित शर्मा सर्वात अव्वल स्थानी आहे. रोहितने टी-२० क्रिकेटध्ये ३८० षटकार मारले आहेत. त्याने ३४० टी-२० सामने खेळले आहेत. तर आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये १०८ सामन्यात १२७ षटकार मारले आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानावर सुरेश रैना आहे. त्याने ३१९ सामन्यात ३११ षटकार मारलेत. १५ ऑगस्ट रोजी धोनी सोबत निवृत्त घेणाऱ्या रैनाने आयपीएलचा १३वा हंगाम देखील खेळला नाही. तर तिसऱ्या स्थानावर माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने ३३१ टी-२० सामन्यात ३०२ षटकार मारलेत. यातील ५२ षटकार आंतरराष्ट्रीय सामन्यातील आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 8, 2020 5:05 pm