कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली आज भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरूद्ध मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे. १४ ते १९ जानेवारी दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची ही मालिका खेळली जाणार आहे. भारताने नुकतेच श्रीलंकेला टी २० मालिकेत २-० असे पराभूत केले आहे, तर ऑस्ट्रेलियाच्या संघाने न्यूझीलंडला कसोटी मालिकेत ३-० अशी धूळ चारली आहे. त्यामुळे दोनही संघ आज एकमेकांसमोर विजयी लय घेऊन उभे ठाकणार आहेत. या मालिकेत कॅप्टन कोहलीला एक पराक्रम करण्याची संधी आहे.

IND vs AUS : वानखेडेवर आज तरी भारत जिंकणार का?

ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना आतापर्यंत कर्णधार विराट कोहली याने ८ एकदिवसीय शतके ठोकली आहेत. भारतीय संघाकडून ऑस्ट्रेलिया विरोधात सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या एकदिवसीय खेळाडूंच्या यादीत सध्या विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत अव्वल स्थानी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरूद्ध ९ शतके लगावली आहेत. त्यामुळे सध्या विराट सचिनच्या विक्रमाशी बरोबरी करण्यापासून केवळ १ पाऊल दूर आहे. या मालिकेत एक शतक ठोकून सचिनच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची विराटला संधी आहे.

IND vs AUS : मुंबईच्या वानखेडेवर १३ वर्षांनी वन-डे सामना

भारताचा संघ

विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत. केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह</p>

विराटच्या फलंदाजीचा क्रमांक बदलणार? ‘कॅप्टन कोहली’चं सूचक वक्तव्य

ऑस्ट्रेलिया संघ

अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, पीटर हँड्सकोम्ब, अ‍ॅलेक्स कॅरे, पॅट कमिन्स, अ‍ॅश्टन टर्नर, मार्नस लाबूशेन, केन रिचर्डसन, जोश हेजलवूड, मिशेल स्टार्क, सीन अ‍ॅबॉट, अ‍ॅश्टन अगार, अ‍ॅडम झम्पा

IND vs AUS : भारताला भारतातच हरवू – अ‍ॅरोन फिंच

असे रंगतील सामने

१४ जानेवारी : पहिला सामना – मुंबई
१७ जानेवारी : दुसरा सामना – राजकोट
१९ जानेवारी : तिसरा सामना – बंगळुरू