भारताच्या ‘हिटमॅन’चं धडाकेबाज शतक आणि कर्णधार विराट कोहलीच्या झंजावाती अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात विजय मिळवत मालिकेत २-१ ने बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं २८७ धावांचं आव्हान भारताने ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. रोहित शर्माने ११९ तर कर्णधार विराट कोहलीने ८९ धावा केल्या.
तिसऱ्या सामन्यात कॅप्टन कोहलीने दमदार खेळीसह एक महत्त्वाचा विक्रम मोडला. त्याने केलेल्या ८९ धावांच्या कामगिरीच्या जोरावर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार ठरला. हा विक्रम आधी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावे होता. त्याच्या नावे कर्णधार म्हणून ११ हजार २०७ धावा आहेत. त्यापुढे जात विराटने ११ हजार २०८ धावा केल्या. या यादीत मोहम्मद अझरूद्दीन तिसरा तर सौरव गांगुली चौथा आहे.
Back to back half-centuries for Virat Kohli
This is his 57th in ODIs https://t.co/VThwmeOEBJ #INDvAUS pic.twitter.com/esn0ODKHGh
— BCCI (@BCCI) January 19, 2020
कर्णधार म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा –
विराट कोहली – ११,२०८ धावा (१९९ डाव)
महेंद्रसिंग धोनी – ११,२०७ धावा (३३० डाव)
मोहम्मद अझरूद्दीन – ८,०९५ धावा (२३० डाव)
सौरव गांगुली – ७,६४३ (२१७ डाव)
असा रंगला तिसरा सामना
२८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि लोकेश राहुल सलामीला उतरले. पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत त्यांनी चांगली सुरूवात करून दिली. लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर विराट आणि रोहित जोडीने कांगारुंच्या नाकी नऊ आणले. प्रत्येक गोलंदाजांवर हल्लाबोल करत भारतीय फलंदाजांनी धावांचा ओघ सुरुच ठेवला. रोहित शर्माने आपले शतक तर विराटने आपले अर्धशतक साजरे केले. रोहित आणि विराट बाद झाल्यावर श्रेयस अय्यर आणि मनिष पांडे जोडीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
#TeamIndia pic.twitter.com/IQmm5Vrf8I
— BCCI (@BCCI) January 19, 2020
त्याआधी, स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन या फलंदाजांनी केलेल्या आश्वासक खेळामुळे कांगारुंनी अखेरच्या वन-डे सामन्यात २८६ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचचा निर्णय पुरता चुकला. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या षटकापासून भेदक मारा करत कांगारुंच्या धावगतीवर अंकुश लावला. मात्र स्मिथ आणि लाबुशेनच्या महत्वपूर्ण भागीदारीमुळे कांगारुंनी सन्मानजनक धावसंख्या गाठता आली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 20, 2020 11:14 am