05 March 2021

News Flash

पराभवानंतरही विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघ ‘अजिंक्य’

विराट कोहलीच्या नावावर मोठा विक्रम

विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाला तिसऱ्या टी-२० सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियानं १२ धावांनी पराभव केला. यासोबतच तीन सामन्याची टी-२० मालिका भारतानं २-१ च्या फरकानं जिंकली आहे. तिसऱ्या सामन्यातील पराभवानंतरही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. तीन किंवा त्यापेक्षा जास्त टी-२० सामन्याच्या द्विपक्षीय मालिकेत विराट कोहली आतापर्यंत अजय आहे.

तीन सामन्याच्या मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाचा २-१ च्या फरकारनं पराभव करत एकदिवसीय मालिकेतील पराभवाची भारतीय संघानं सव्यज परतफेड केली. विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारताचा हा लागोपाठ बारावा मालिका विजय आहे. २०१७ पासून विराट कोहलीचा विजयरथ सुरुच आहे.

२०१७ मध्ये पहिल्यांदा विराट कोहलीकडे भारतीय संघाचं नेतृत्व आलं होतं. त्यावेळी भारतीय संघानं तीन सामन्याची टी-२० मालिका २-१ च्या फराकनं जिंकली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी-२० मालिका १-१ ने बरोबरीत राहिली होती. भारताने शेवटची तीन किंवा त्यापेक्षा जास्त सामन्याची टी-20 मालिका न्यूझीलंड विरुद्ध खेळली होती. ज्यामध्ये भारताने ५-० या फरकाने विजय मिळवला होता.

विराट कोहलीची टी-२० मालिकेतील कामगिरी-

२-१ इंग्लंड, २०१७
१-१ ऑस्ट्रेलिया, २०१७
२-१ न्यूझीलंड, २०१७
२-१ दक्षिण आफ्रिका, २०१८
२-१ इंग्लंड, २०१८
१-१ ऑस्ट्रेलिया, २०१८
३-० वेस्ट इंडिज, २०१९
१-१ दक्षिण आफ्रिका, २०१९
२-१ वेस्ट इंडिज, २०१९
२-० श्रीलंका, २०२०
५-० न्यूझीलंड, २०२०
२-१ ऑस्ट्रेलिया, २०२०

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 5:55 pm

Web Title: india vs australia virat kohli team india t20 record india tour australia nck 90
Next Stories
1 कोहलीची कर्णधारपदाला साजेशी खेळी, सचिनच्या विक्रमाशी केली बरोबरी
2 विराट कोहलीचं तुफान; धोनी, रोहितच्या पंगतीत मिळवलं स्थान
3 चेस मास्टर! विराट कोहलीचा आणखी एक विक्रम
Just Now!
X