मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरूवात खराब झाली. भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन दोघे खेळायला मैदानात उतरले, पण मुंबईच्या मैदानावर रोहित शर्मा दणकेबाज खेळी करू शकला नाही. रोहित शर्मा १५ चेंडूत १० धावांवर माघारी परतला.

Video : विराटचा झॅम्पाने घेतलेला हा भन्नाट झेल पाहिला का?

रोहित बाद झाल्यानंतर शिखर धवन आणि लोकेश राहुलने डाव सांभाळला. या दोघांनी दमदार खेळी करत भारताला शतक गाठून दिले. या दरम्यान धवनने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्या पाठोपाठ लोकेश राहुलही अर्धशतकाच्या नजीक पोहोचला होता, पण त्याला अर्धशतकाने हुलकावणी दिली. ६१ चेंडूत ४७ धावांवर तो माघारी परतला. त्यानंतर मात्र भारताकडून मोठी भागीदारी झाली नाही.

IND vs AUS : ‘हिटमॅन’ स्वस्तात बाद; तरीही मोडला सचिन, विराटचा विक्रम

चौथ्या क्रमांकावर मैदानात आलेल्या विराट कोहलीने भारतीयांची निराशा केली. १३ चेंडूत १६ धावांवर खेळत असताना विराट बाद झाला. शिखर धवन दमदार अर्धशतकी खेळी केल्यावर ७४ धावांवर बाद झाला. रविंद्र जाडेजाने थोडा वेळ प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्याने फिरकीपटू अस्टन अगार याला चांगलाच दणका दिला. ८ चेंडूत २ धावा केलेल्या असताना जाडेजाने दणकेबाज षटकार लगावला. विशेष म्हणजे त्याने गुडघ्यावर बसून हा उत्तुंग षटकार लगावला.

क्रिकेटच्या मैदानात त्याने असं काही केलं की… स्टेडियममध्ये दोन वर्ष ‘नो एन्ट्री’

पाहा व्हिडीओ

त्या फटक्यानंतर मात्र जाडेजाला फारसा प्रभाव पाडता आला नाही. ३२ चेंडूत २५ धावा करून तो बाद झाला.