भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १४ जानेवारीपासून एकदिवसीय मालिका खेळण्यात येणार आहे. ३ सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व अ‍ॅरोन फिंच याच्याकडे आहे. ऑस्ट्रेलियाचा उदयोन्मुख खेळाडू मार्नस लाबूशेन याने भारतात भारताविरूद्ध खेळणं आव्हानात्मक असल्याचे म्हटले असतानाच आस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंचने मात्र भारताला भारतात सहज पराभूत करू असा विश्वास व्यक्त केला आहे.

ICC Test Rankings : विराट is Best!; अजिंक्य रहाणेला मात्र फटका

आस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंच म्हणाला की भारतात भारतीय संघाविरूद्ध खेळताना खूप आव्हानांचा सामना करावा लागतो. पण आम्ही नुकतेच न्यूझीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेत निर्भेळ यश मिळवले आहे. त्यामुळे आमच्या संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर कशा पद्धतीने कसा खेळ करायचा याचा आमच्याकडे प्लॅन तयार आहे त्यामुळे आम्ही दडपणाखाली नाही.

मुंबईकर खेळाडू भडकला; ICC ला म्हणाला, “नुसत्या कल्पना नकोत, जरा विचार पण करा” 

तो पुढे म्हणाला, “भारतीय उपखंडात खेळताना मोठी समस्या अशी असते की तुमच्या बनवलेल्या योजनांवर तुम्हीच शंका घेता. कारण उपखंडात जेव्हा यजमान संघ चांगल्या लयीत येतो तेव्हा तो समोरच्या संघाला चांगलाच दबाव टाकतो. भारत असो किंवा पाकिस्तान असो किंवा श्रीलंका असो, ते चांगल्या लयीत असले की प्रतिस्पर्धी संघाला सहज धूळ चारतात”, असे फिंचने स्पष्ट केले.

इंग्लंडचा स्टार क्रिकेटपटू ICC च्या विरोधात, कारण…

“भारतीय संघाविरूद्ध भारतात खेळण्यासाठी आम्ही काही योजना आखल्या आहेत. आमच्या संघाकडे भारताला पराभूत करण्यासाठी प्रतिभावंत खेळाडू आहेत. भारताला पराभवाचं पाणी पाजण्यासाठी तेवढंच पुरेसं आहे. आणि आम्ही त्या योजना अंमलात आणू शकू याचा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे आम्ही टीम इंडियाला सहज धूळ चारू”, असा विश्वास फिंचने व्यक्त केला.