12 August 2020

News Flash

दिवस-रात्र कसोटीत महेंद्रसिंह धोनी दिसणार नव्या रुपात ?

इडन गार्डन्स मैदानावर रंगणार सामना

२२ नोव्हेंबरला विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगणार आहे. सौरव गांगुलीने बीसीसीआयची सुत्र हाती घेतल्यानंतर संघटनेमध्ये महत्वाचे बदल होताना दिसत आहेत. या महत्वाच्या सामन्यासाठी, प्रक्षेपण करणारी वाहिनी Star Sports महेंद्रसिंह धोनीला समालोचनासाठी आमंत्रित करण्याच्या विचारात आहे. IANS वृत्तसंस्थेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

पहिल्या दोन दिवसांसाठी धोनीला समालोचनासाठी बोलवण्याचा विचार असून यादरम्यान धोनी आपल्या कसोटी क्रिकेटमधल्या आठवणी शेअर करेल, असा Star Sports वाहिनीचा विचार आहे. जर धोनीने ही ऑफर स्विकारल्यास भारताच्या पहिल्या दिवस-रात्र कसोटीत धोनी समालोचन कक्षात पहायला मिळणार आहे.

याआधी दिवस-रात्र कसोटी सामन्यांना बीसीसीआयचा विरोध होता. मात्र सौरव गांगुलीने अध्यक्षपदाची सुत्र हाती घेतल्यानंतर, खास या सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने ७२ गुलाबी चेंडूही मागवल्याचं कळतंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2019 4:03 pm

Web Title: india vs bangladesh%e2%80%89ms%e2%80%89dhoni could be a guest commentator in day night test psd 91
टॅग Ind Vs Ban,Ms Dhoni
Next Stories
1 डोंबिवलीकर गोपेंद्र बोहराची ओमानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड
2 भारतीय खेळाडूही तणावात, पण…! युवराजचं धक्कादायक विधान
3 टीम इंडियाच्या ‘गब्बर’ला सुनील गावसकरांचा गंभीर इशारा, म्हणाले…
Just Now!
X