News Flash

विराट कोहली रनमशीन ! BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने केलं कौतुक

कोलकाता कसोटीत विराटचं शतक

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने कोलकाता कसोटी सामन्यात ऐतिहासिक खेळी केली आहे. आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणाऱ्या विराट कोहलीने शतक झळकावलं. दिवस-रात्र कसोटीत शतक झळकावणारा विराट पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. विराटने १९४ चेंडूत १८ चौकारांसह १३६ धावा केल्या. त्याच्या या खेळीचं बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने कौतुक केलं आहे.

“विराट कोहली उत्कृष्ट खेळाडू आहे, माझ्यासाठी तो एक रनमशिन आहे. आपण सर्वांनी त्याला गुलाबी चेंडूवर खेळताना पाहिलं आहे, पारंपरिक चेंडूपेक्षा गुलाबी चेंडूवर खेळणं अधिक सोपं आहे.” विराट कोहलीच्या शतकी खेळीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सौरव गांगुली बोलत होता.

अवश्य वाचा – IND vs BAN : ऐतिहासिक कसोटीत विराटचं शतक ! रिकी पाँटींगशी केली बरोबरी

दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने विराट कोहलीचं हे ४१ वं शतक ठरलं. या कामगिरीसह विराट कोहलीने माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटींगशी बरोबरी केली आहे. पहिल्या दिवशी चेतेश्वर पुजाराने अर्धशतक झळकावल्यानंतर, उप-कर्णधार अजिंक्य रहाणेनेही अर्धशतकी खेळी करत विराटला साथ दिली. अजिंक्यने ६९ चेंडूत अजिंक्यची ७ चौकारांसह ५१ धावांची खेळी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2019 8:26 pm

Web Title: india vs bangladesh%e2%80%89sourav ganguly lauds virat kohli calls him a run machine psd 91
Next Stories
1 IND vs BAN : टीम इंडियाची विक्रमी कामगिरी, तब्बल १० वर्ष जूना विक्रम मोडला
2 IND vs BAN : दिवस-रात्र कसोटी सामन्यात कर्णधार विराटचा विक्रम, स्टिव्ह स्मिथला टाकलं मागे
3 IND vs BAN : ऐतिहासिक शतकासह विराटची सचिनच्या कामगिरीशी बरोबरी
Just Now!
X