पाचही दिवस पावसाचा व्यत्यय कायम राहिल्याने भारत-बांग्लादेशमधील कसोटी सामना अखेर अनिर्णित राहिला.
कसोटीच्या शेवटच्या दिवशी बांग्लादेशला भारताने फॉलोऑन दिला होता. त्यापूर्वी, आर.अश्विन आणि हरभजन सिंग या भारताच्या फिरकीपटुंपुढे बांग्लादेशचा पहिला डाव २५६ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारताला २०६ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर फॉलोऑन घेऊन बांग्लादेशचा संघ पुन्हा फलंदाजीला आला होता. बांग्लादेशला जिंकण्यासाठी ३० षटकांत २०७ धावा हव्या होत्या. मात्र बांग्लादेशने १४ षटकांत केवळ २३ धावा केल्या. सामन्याची १६ षटके शिल्लक असताना  वेळ संपल्याने  कसोटी अनिर्णित घोषित करण्यात आली.
यापूर्वी, चौथ्या दिवशी भारताने सहा बाद ४६२ वर डाव घोषित केल्यानंतर बांगलादेशने खेळण्यास सुरुवात केली. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे केवळ ३० षटकांचा खेळ होऊ शकला होता. खेळ संपला तेव्हा बांग्लादेशची धावसंख्या तीन बाद १११ होती.