भारताविरूद्धच्या पहिल्या टी २० सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला. भारताने दिलेले १४९ धावांचे आव्हान अनुभवी मुश्फिकुर रहीमच्या तडाखेबाज अर्धशतकाच्या बळावर बांगलादेशने सहज पूर्ण केले. या विजयासह बांगलादेशने भारताविरूद्ध टी २० इतिहासातील पहिला सामना जिंकला. या आधीच्या ८ सामन्यात भारताने बांगलादेशला धूळ चारली होता.

“आम्हाला स्वस्तातला जाडेजा नकोय”; कृणाल पांड्यावर भडकले नेटिझन्स

सामन्यानंतर बोलताना रोहितने पराभव मान्य केला. “विजयाचे श्रेय बांगलादेशला न देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही फलंदाजी करत असताना आम्ही फार चुकीच्या वेळी गडी गमावले. आम्ही दिलेल्या आव्हानाचा बचाव करणे शक्य होते, पण आम्ही मैदानावर चुका केल्या. दोन रिव्ह्यूबद्दलच्या निर्णयाचा आम्हाला फटका बसला. पण त्यातून काही गोष्टी शिकायला मिळाल्या.”, असे रोहितने प्रामाणिकपणे कबूल केले.
आम्ही बांगलादेशला समाधानकारक आव्हान दिले, पण फिल्डींगमध्ये आम्ही कमी पडलो. युझवेंद्र चहलला संघात घेण्यात आमचा खूप दिवसांपासून मानस होता. त्याने अपेक्षेप्रमाणे उत्तम गोलंदाजी केली. सामन्याच्या मधल्या टप्प्यात त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांना ‘ब्रेक’ लावला होता. पण काही ठिकाणी तो कमनशिबी ठरला”, असेही रोहितने सांगितले.

दरम्यान, १४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरूवात काहीशी खराब झाली होती. लिटन दास (७) आणि मोहम्मद नईम (२६) लवकर बाद झाले. काही वेळाने खेळपट्टीवर स्थिरावलेला सौम्या सरकारही ३९ धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यामुळे भारत सामना जिंकणार अशी आशा चाहत्यांना होती. पण मुश्फिकुर रहीम सामन्याचा सगळा भार आपल्या खांद्यावर घेत तडाखेबाज नाबाद ६० धावा केल्या आणि बांगलादेशला पहिला विजय मिळवून दिला.

ये है जीत का राज… मुश्फिकूर रहीमने सांगितले कारण

त्याआधी, पहिल्या डावात भारताचा कर्णधार रोहित शर्मा (९), लोकेश राहुल (१५), श्रेयस अय्यर (२२) झटपट बाद झाले. शिखर धवन आणि ऋषभ पंत यांच्यात चांगली भागीदारी होत असतानाच मैदानात त्या दोघांमध्ये धाव घेण्यावरून गोंधळ झाला. त्यामुळे शिखर धवन धावबाद झाला. धवनने ३ चौकार आणि १ षटकार लगावत ४२ चेंडूत ४१ धावा केल्या. पदार्पणाचा सामना खेळणारा मुंबईकर शिवम दुबेही एक धाव करून बाद झाला. पाठोपाठ दिल्लीकर ऋषभ पंतही २७ धावांवर माघारी परतला. शेवटच्या टप्प्यात क्रुणाल पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर भारताने २० षटकात ६ बाद १४८ पर्यंत मजल मारली होती.