News Flash

पहिल्या टी-२० सामन्याआधी भारतीय गोटात चिंता, कर्णधार रोहितला दुखापत

रोहितच्या डाव्या मांडीला दुखापत

भारत विरुद्ध बांगलादेश मालिका सुरु होण्याआधीच यजमान संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा टी-२० संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या डाव्या मांडीला दुखापत झाली आहे. यामुळे रोहितला आपला सराव अर्ध्यावरच सोडावा लागला आहे. नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत असताना एक चेंडू रोहितच्या मांडीवर आदळला.

अवश्य वाचा – कर्णधारपदाबद्दल रोहित शर्माचं मोठं विधान, म्हणाला….

दरम्यान रोहितला झालेल्या दुखापतीवर वैद्यकीय टीम उपचार करत असून लवकरच तो पहिल्या सामन्यात खेळेल की नाही याबद्दल स्पष्ट केलं जाईल असं भारतीय संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केलं आहे. कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देत भारतीय निवड समितीने रोहित शर्माच्या हाती भारतीय संघाचं नेतृत्व सोपवलं होतं.

बांगलादेशविरुद्ध टी-२० मालिकेसाठी असा असेल भारताचा संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, युझवेंद्र चहल, राहुल चहर, दीपक चहर, खलिल अहमद, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 5:02 pm

Web Title: india vs bangladesh rohit sharma injures left thigh leaves training midway psd 91
Next Stories
1 Video : शॉट खेळला पण क्रीजमध्ये यायलाच विसरला… पहा विचित्र ‘रन आऊट’
2 दिया मिर्झा बीसीसीआयवर भडकली, जाणून घ्या कारण…
3 ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीला दिग्गजांची हजेरी? BCCI लागलं तयारीला
Just Now!
X