अपेक्षांचे प्रचंड ओझे असलेल्या भारतीय पुरुष संघ तब्बल ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्याचा निर्धार करतच आज विश्वविजेत्या बेल्जियमविरोधात मैदानात उतरला आहे. आठ सुवर्णपदकांसह ११ ऑलिम्पिक पदके खात्यावर असणाऱ्या भारताने एके काळी हॉकीमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील सध्याच्या भारतीय संघाला त्या यशाची पुनरावृत्ती साद घालत आहे. रविवारी भारताने ब्रिटनला ३-१ असे नमवून उपांत्य फेरी गाठली आणि आता भारत पदकापासून एका विजयाच्या अंतरावर आहे, याची प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांना खात्री असून आजच्या सामन्यात भारत कशी कामगिरी करतो याकडे सर्व जगाचं लक्ष लागलं आहे. १९८० च्या ऑलिम्पिकमधील भारताने अखेरचे सुवर्णपदक ब्रिटनला ३-१ अशा फरकाने हरवून प्राप्त केले होते. पण त्यावेळी उपांत्य फेरीचा सामना नव्हता. १९७२ मधील म्युनिक ऑलिम्पिकमध्ये भारताने अखेरची उपांत्य फेरी गाठली होती. तेव्हा पाकिस्तानकडून भारताने ०-२ अशी हार पत्करली होती. दुसऱ्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून १-७ असा पराभव पत्करल्यानंतर भारताने सलग चार सामन्यांमध्ये दणदणीत विजय मिळवत आजच्या ऐतिहासिक सामन्यात प्रवेश केलाय.

नक्की वाचा >> India vs Belgium Men Hockey Semifinal : सामना सुरु असतानाच पंतप्रधान मोदींचं ट्विट, म्हणाले…

पहिल्या पाच मिनिटांमध्ये बेल्जियमने सामन्यावर वर्चस्व गाजवलं. सामना सुरु झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच बेल्जियमने गोल करत १-० ची आघाडी घेतली. मात्र त्यानंतर भारताने दोन मिनिटांच्या अंतरात एकामागोमाग एक दोन गोल करत २-० ने आघाडी मिळवली. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने २-१ ची आघाडी कायम ठेवली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये केवळ एक गोल झाला. बेल्जियमने केलेल्या या एकमेव गोलमुळे हाफ टाइमनंतर सामना २-२ च्या बरोबरीत आहे.

चौथा क्वार्टर –

८:४४ – भारतीय संघाचा ५-२ ने पराभव

८:४४ – बेल्जियमचा पाचवा गोल.

८:३५ – अ‍ॅलेक्झॅण्डर हेनरीक्सची सामन्यामध्ये हॅटट्रीक, बेल्जियमला ४-२ ची आघाडी. शेवटच्या सात मिनिटांचा खेळ शिल्लक

८:३४ – बेल्जियमला पेनल्टी स्ट्रोक्सची संधी

८:३१ – अंगाचा वापर करुन भारतीय खेळाडूंनी चेंडू अडवल्याने पुन्हा बेल्जियमला एकामागोमाग एक तीन पेनल्टी कॉर्नर देण्यात आले.

८:३० – बेल्जियमला दोन पेनल्टी कॉर्नर.

८:२८ – मनप्रीत मैदानात परतला.

८:२५ – अ‍ॅलेक्झॅण्डर हेनरीक्सने केला गोल. बेल्जियमला ३-२ ची आघाडी

८:२४ – एकामागोमाग एक तीन पेनल्टी कॉर्नर.

८:२२ – भारतीय कर्णधार मनप्रीतला ग्रीन कार्ड, दोन मिनिटांसाठी मनप्रीत मैदानाबाहेर

८:१९ – चौथ्या क्वार्टरचा खेळ सुरु.

तिसरा क्वार्टर –

८:१५ – तिसऱ्या क्वार्टरचा खेळ संपला. या क्वार्टरमध्ये एकाही संघाला गोल करता आला नाही.

८:११ – या पूर्वी भारत आणि बेल्जियममध्ये झालेल्या पाच सामन्यांपैकी चार सामने भारताने जिंकलेत.

८:०८ – भारताला सामन्यातील पाचवा पेनल्टी कॉर्नर मिळाला, मात्र या संधीचं सोन भारताला करता आलं नाही. सामना २-२ च्या बरोबरीत.

८:०७ – बेल्जियमने रेफ्रलची संधी गमावली.

८:०२ – बेल्जियमला सामन्यात आतापर्यंत एकूण सात पेनल्टी कॉर्नर मिळाले असून त्यांचे दोन्ही गोल पेनल्टी कॉर्नरवरच झालेत.

७:५७ – तिसऱ्या क्वार्टरमधील खेळाला सुरुवात

दुसरा क्वार्टर –

७:४६ – बेल्जियमला फ्री हीट मिळाला मात्र त्यांना याचा फायदा करुन घेता आला नाही

७:४६ – भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, मात्र गोल करण्यात अपयश

७:४२ – बेल्जियमला पेनल्टी कॉर्नर मिळाला, मात्र या पेनल्टी कॉर्नरचं गोलमध्ये रुपांतर करता आलं नाही

७:४० – भारताने रेफ्रलची संधी गमावली.

७:३१ – बेल्जियमचा दुसरा गोल, साधली २-२ची बरोबर; पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये केलं रुपांतर.

७:२९ – पहिल्या तीन मिनिटांमध्ये बेल्जियमला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले मात्र त्यापैकी एकाचेही रुपांतर गोलमध्ये करता आलं नाही.

७:२४ – दुसऱ्या क्वार्टरमधील खेळाला सुरुवात.

पहिला क्वार्टर – 

७:१५ – सामन्यात मागील दहा मिनिटांमध्ये तीन गोल झालेत.

७:१३ – मनदीपने लगेच दोन मिनिटांनी भारताला २-१ ने आघाडी मिळवून दिली.

७:११ – हरमनप्रीत सिंगने गोल करत भारताला १-१ ची बरोबरी साधण्यास मदत केली. हा हरमनप्रीतचा या मालिकेतील पाचवा गोल ठरला.

७:०२ – सामन्याच्या सुरुवातीलाच बेल्जियमने गोल करत १-० ची आघाडी मिळवली.