अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारतीय संघानं पाहुण्या इंग्लंड संघाचा १० विकेटनं दारुण पराभव केला. दिवसरात्र कसोटी सामन्यात अक्षर पटेल यानं ११ बळी घेत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दुसऱ्या डावांत इंग्लंड संघाला ८१ धावांत गुंडाळल्यानंतर अवघ्या ५९ धावांचं आव्हान भारतीय संघानं सहज पार केलं. रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामीवीरांनी भारतीय संघाला ७.४ षटकांत सामना जिंकून दिला. रोहित शर्मानं नाबाद २५ तर गिल यानं नाबाद १५ धावांची खेळी केली. धावांचा पाठलाग करताना गिल आणि रोहित शर्मा यांनी प्रत्येकी एक एक षटकार लगावला. यामधील रोहित शर्माचा षटकार खास होता… कारण भारतीय संघाला विजयासाठी अवघ्या सहा धावांची गरज असताना रोहितनं खणखणीत षटकार लगावला.

आणखी वाचा- IND vs ENG : खेळपट्टी उपयुक्त होती की नाही, हे ICC ठरवेल – जो रुट

८ व्या षटकात इंग्लंडचा कर्णधार जो रुट गोलंदाजी करत असताना पहिल्या दोन चेंडूवर रोहितने खणखणीत चौकार ठोकले. त्यानंतर तिसरा चेंडू निर्धाव गेला. त्यावेळी भारताला विजयासाठी केवळ ६ धावांची गरज होती. त्यामुळे रोहितने चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारतानं विजय मिळवल्यानंतर रोहित शर्मा आणि गिल यांनी इंग्लंडच्या खेळाडूंसोबत हस्तोंदलन केले. त्यानंतर ते मैदानातून बाहेर जाण्यास निघाले. त्यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहली भलताच खुश दिसत होता. त्याने मैदानात येताना आनंदाने पहिले पुढे असलेल्या शुबमनचे अभिनंदन केले आणि नंतर त्याने काहीतरी हसत म्हणताना रोहितचेही अभिनंदन केले.

आणखी वाचा- चांगली की वाईट?; खेळपट्टीवरुन आजी-माजी क्रिकेटपटूंमध्येच रंगला सामना

पाहा व्हिडीओ –

अक्षर पटेल आणि आर. अश्विन यांच्या फिरकीपुढे इंग्लंडच्या फंलदाजांनी लोटांगण घातलं.