England vs India 2nd Test Live Updates : क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर आजपासून दुसरा कसोटी सामना खेळला जाणार होता. मात्र पावसाच्या सततच्या अडथळ्यामुळे अखेर पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. या सामन्यात अद्याप नाणेफेकही झालेली नाही. सामना सुरू होण्यास विलंब झाला असल्याने नाणेफेकीआधीच खेळाडूंना लंच ब्रेक घ्यावा लागला होता. त्यानंतर चहापानाची विश्रांतीदेखील घेण्यात आली होती. अखेर स्थानिक वेळेनुसार ४ वाजून ४५ मिनिटांनी पहिल्या दिवसाचा सामना रद्द करण्यात आल्याची माहिती ICCने दिली.

या मैदानावर इतिहास भारताच्या बाजूने नसला तरी भारतीय संघ यंदा इतिहास बदलण्यासाठी उत्सुक आहे. भारताने या मैदानावर १७ कसोटी सामने खेळले आहेत. त्या सामन्यांपैकी भारताने अवघ्या दोन सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यापैकी एक विजय १९८६ मध्ये तर दुसरा विजय २०१४ मध्ये मिळवलेला आहे. याशिवाय भारताला ११ लढती गमवाव्या आहेत, तर चार सामने बरोबरीत सुटले आहेत.

Live Blog

20:37 (IST)09 Aug 2018
एकही चेंडू न खेळता खेळाडूंचे ‘चहापान’

लॉर्ड्सच्या मैदानावर आजपासून दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. पण  पावसाच्या अडथळ्यामुळे अद्याप नाणेफेकही झालेली नाही. सामना सुरू होण्यास विलंब झाला असल्याने नाणेफेकी आधीच खेळाडूंना लंच ब्रेक घ्यावा लागला होता. त्यानंतर आता चहापानाची विश्रांतीदेखील घेण्यात आली आहे.

17:14 (IST)09 Aug 2018
पावसाचा खेळ; नाणेफेकी आधीच 'लंच ब्रेक'

लॉर्ड्स मैदानावर आजपासून दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. मात्र पावसाचा अडथळा असल्याने नाणेफेकीला आणि सामना सुरू होण्यास विलंब झाला आहे. दरम्यान, सामना अद्याप सुरू न झाल्याने नाणेफेकी आधीच खेळाडूंना लंच ब्रेक घ्यावा लागला आहे.