England vs India 3rd Test Live Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीत भारताने दुसऱ्या दिवसअखेर २ बाद १२४ धावांपर्यंत मजल मारली. शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. पण मोठी धावसंख्या उभारण्यात त्यांना यश आले नाही. राहुल ३५ तर शिखर धवन ४४ धावांवर तंबूत परतला. सध्या चेतेश्वर पुजारा ३३ तर कर्णधार विराट कोहली ८ धावांवर खेळत आहेत. त्याआधी पहिल्या डावात भारताला ३२९ धावा करता आल्या. त्यानंतर इंग्लंडचा डाव केवळ १६१ धावांत गुंडाळण्यात भारताला यश आले. या डावात हार्दीक पांड्याने २८ धावा देऊन ५ बळी टिपले. जोस बटलरने सर्वाधिक ३९ धावा केल्या. हार्दिकच्या या कामगिरीमुळे भारताला दुसऱ्या दिवसअखेरीस २९२ धावांची भक्कम आघाडी घेता आली आहे.

आज सामन्याचा दुसऱ्या दिवशी भारताने इंग्लंडचा पहिला डाव केवळ १६१ धावांत गुंडाळला. उपहारापर्यंत इंग्लंडने संयमी खेळ करत बिनबाद ४६ धावांपर्यंत मजल मारली होती. कूक आणि जेनिंग्स जोडीने भारतीय गोलंदाजांचे आक्रमण परतावून लावत अर्धशतकाकडे वाटचाल केली. पण उपहारानंतर कूक (२९) आणि जेनिंग्स (२०) दोघेही बाद झाले. पुढे इंग्लंडच्या डावाला स्थैर्य मिळत असल्याचे वाटत असतानाच नवोदित ओली पोप बाद झाला. ऋषभ पंत याने डावातील तिसरा झेल टिपला. इशांत शर्माने त्याला बाद केले. त्या नंतर हार्दिक पांड्याच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडच्या फलंदाजांचे धाबे दणाणले. जो रूट (१६), जॉनी बेअरस्टो (१५), ख्रिस वोक्स (८), आदिल रशीद (५) आणि स्टुअर्ट ब्रॉड (०) या पाच फलंदाजांना त्याने तंबूत धाडले. तर दुसरीकडे मोहम्मद शमीने बेन स्टोक्स (१०)चा काटा काढला. जोस बटलर याने काही काळ झुंज दिली. पण फटके मारण्याच्या नादात तो देखील सर्वाधिक ३९ धावा करून बाद झाला. त्यामुळे भारताकडे आता १६८ धावांची आघाडी आहे. हार्दिक पांड्याने केवळ २८ धावांत ५ बळी टिपले, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमरा यांनी प्रत्येकी २ तर मोहम्मद शमीने १ बळी टिपला.

आपला पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या ऋषभ पंतने पाच झेल टिपले. अशी कामगिरी करणारा तो तिसरा यष्टीरक्षक ठरला.

त्याआधी ६ बाद ३०७ धावसंख्येवरून भारताच्या फलंदाजांनी डाव पुढे सुरू केला. दिवसाच्या सुरुवातीलाच भारताला सातवा धक्का बसला. नवोदित ऋषभ पंत २४ धावा करून माघारी परतला. स्टुअर्ट ब्रॉडने त्याचा त्रिफळा उडवला. ऋषभ पंत बाद झाल्यानंतर पाठोपाठ अश्विन, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा तिघेही झटपट बाद झाले. एकूण ४ पैकी ब्रॉड आणि अँडरसन दोघांनी २-२ बळी टिपले. त्यामुळे केवळ २२ धावांची भर घालून भारताचा डाव संपुष्टात आला. विराट-अजिंक्य वगळता भारताचे फलंदाज पुन्हा अपयशी ठरले. डावाच्या सुरूवातीला भारताचे पहिले तीन बळी लवकर बाद झाले होते. पण विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या जोडीने इंग्लिश गोलंदाजांची पुरेपूर धुलाई केली. विराटने ९७ तर अजिंक्यने ८१ धावा काढत भारताला मजबूत स्थितीत आणले होते. पण पुढील फलंदाजांनी मात्र निराशा केली. पहिल्या डावात इंग्लंडकडून ख्रिस वोक्स, जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी प्रत्येकी ३-३ बळी टिपले, तर आदिल रशीदने १ गडी बाद केला.

Live Blog

23:44 (IST)19 Aug 2018
इंग्लंडच्या फलंदाजांना हार्दिकचा ‘पंच’; भारताकडे २९२ धावांची भक्कम आघाडी

इंग्लंडच्या फलंदाजांना हार्दिकचा ‘पंच’; भारताकडे २९२ धावांची भक्कम आघाडी

23:03 (IST)19 Aug 2018
अर्धशतकाची शिखर धवनला हुलकावणी, भारताचा दुसरा गडी बाद

सलामीवीर शिखर धवनला अर्धशतकाने हुलकावणी दिली. धवन ४४ धावांवर बाद झाला. आदिल रशीदने त्याला बाद केले.

22:23 (IST)19 Aug 2018
भारताला पहिला धक्का, राहुल त्रिफळाचित

भारताने तडाखेबाज सुरुवात केली होती. ९व्या शतकात भारताने अर्धशतक गाठले. पण राहुलला आपली लय कायम राखता आली नाही. स्टोक्सने राहुलला त्रिफळाचित केले.

20:57 (IST)19 Aug 2018
हार्दिक पांड्याचे ५ बळी, इंग्लंडचा पहिला डाव १६१ धावांत आटोपला

भारताच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडचा पहिला डाव १६१ धावांत आटोपला. भारताकडून हार्दिक पांड्याने ५ बळी टिपले. भारताला १६८ धावांची आघाडी मिळाली आहे.

20:29 (IST)19 Aug 2018
हार्दीक पांड्याचे पाच बळी, इंग्लंडची अवस्था बिकट

अष्टपैलू गोलंदाज हार्दिक पांड्याची जादू चालली. इंग्लंडने नववा गडी गमावला असून ब्रॉड शून्यावर बाद झाला. पांड्याने डावातील पाचवा बळी टिपला.

20:21 (IST)19 Aug 2018
हार्दिक पांड्याची जादू, इंग्लंडचा आठवा गडी माघारी

अष्टपैलू गोलंदाज हार्दिक पांड्याची जादू चालली. इंग्लंडचा आठवा गडी गमावला. आदिल रशीद बाद झाला. पांड्याचा हा चौथा बळी ठरला.

20:16 (IST)19 Aug 2018
इंग्लंडच्या डावाला गळती, सातवा गडी तंबूत

भारतीय अष्टपैलू गोलंदाज हार्दीक पांड्या यांच्या गोलंदाजीवर इंग्लंडने सातवा गडी गमावला. इंग्लंडची अवस्था ७ बाद ११८ अशी झाली आहे. ऋषभ पँट याने अप्रतिम झाले घेत वोक्सला झेलबाद केले.

20:12 (IST)19 Aug 2018
इंग्लंडचे सहा गडी बाद, कर्णधार रूट, स्टोक्स पाठोपाठ बेअरस्टोही बाद

भारतीय गोलंदाजांनी कमाल दाखवत झटपट ३ बाली टिपले. कर्णधार रूट, त्या नंतर बेन स्टोक्स आणि लगेचच बेअरस्टोही बाद झाला. त्यामुळे इंग्लंडची अवस्था ६ बाद ११० अशी झाली.

19:03 (IST)19 Aug 2018
नवोदित पोप बाद, इंग्लंडला तिसरा धक्का

इंग्लंडच्या डावाला स्थैर्य मिळत असल्याचे वाटत असतानाच नवोदित ओली पोप बाद झाला. ऋषभ पंत याने डावातील तिसरा झेल टिपला. इशांत शर्माने त्याला बाद केले.

18:33 (IST)19 Aug 2018
उपहारानंतर इंग्लंडला दोन धक्के, दोनही सलामीवीर तंबूत

उपहारापर्यंत शांत आणि संयमी खेळ खेळणाऱ्या इंग्लंडच्या सलामीवीर जोडीला भारतीय गोलंदाजांनी तंबूत धाडले. अलिस्टर कुक २९ तर जेनिंग्स २० धावांवर बाद झाला. इशांतने १ तर बुसराने १ बळी टिपला.

17:56 (IST)19 Aug 2018
इंग्लंडची संयमी सुरूवात, उपहारापर्यंत बिनबाद ४६ धावा

उपहारापर्यंत इंग्लंडने संयमी खेळ करत बिनबाद ४६ धावांपर्यंत मजल मारली. कूक आणि जेनिंग्स जोडीने भारतीय गोलंदाजांचे आक्रमण परतावून लावत अर्धशतकाकडे वाटचाल केली. उपहाराच्या वेळी कूक २१ तर जेनिंग्स २० धावांवर खेळत होता.

16:46 (IST)19 Aug 2018
ब्रॉड-अँडरसन जोडीचा तिखट मारा, भारताचा डाव ३२९ धावांत आटोपला

ऋषभ पंत बाद झाल्यांनतर पाठोपाठ अश्विन, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा तिघेही झटपट बाद झाले. एकूण ४ पैकी ब्रॉड आणि अँडरसन दोघांनी २-२ बळी टिपले. त्यामुळे केवळ २२ धावांची भर घालून भारताचा डाव संपुष्टात आला.

16:25 (IST)19 Aug 2018
भारताला सातवा धक्का, ऋषभ पंत माघारी

भारताला दिवसाच्या सुरुवातीलाच सातवा धक्का बसला. नवोदित ऋषभ पंत २४ धावा करून माघारी परतला. स्टुअर्ट ब्रॉड याने दुसरा बळी टिपला.