05 July 2020

News Flash

India vs England 4th Test – Live : इंग्लंडने फोडली भारताची हंडी, सामन्यासह मालिकाही जिंकली

India vs England Test Series : इंग्लंडने कसोटी मालिकेत घेतली ३-१ अशी विजयी आघाडी

India vs England 4th Test

India vs England 4th test : सगळीकडे गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचा उत्साह असताना भारताला मात्र सामन्यात विजयाचा थर रचता आला नाही. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताचा ६० धावांनी पराभव झाला. इंग्लंडने भारतापुढे चौथ्या डावात विजयासाठी २४५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण भारतीय फलंदाजांना हे लक्ष्य गाठता आले नाही. या विजयाबरोबरच इंग्लंडने कसोटी मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. चौथ्या डावात कर्णधार कोहलीने सर्वाधिक ५८ आणि उपकर्णधार रहाणेनी ५१ धावा केल्या.

आज चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यावर केवळ ११ धावांची भर घालून इंग्लंडचा दुसरा डाव आटोपला. विजयासाठी २४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. लोकेश राहुल भोपळाही न फोडता माघारी परतला. तर पहिल्या डावातील शतकवीर पुजाराही ५ धावांवर बाद झाला. पाठोपाठ सलामीवीर शिखर धवनही १७ धावांवर तंबूत परतला. त्यामुळे उपहारापर्यंत भारताची अवस्था ३ बाद ४६ अशी झाली होती. अखेर कर्णधार कोहली आणि उपकर्णधार रहाणे यांनी डावाला आकार दिला. दोघांनी अर्धशतके केली. पण सामना जिंकून देण्यात ते अपयशी ठरले. दुसरे सत्र संपण्याआधी कोहली बाद झाला. चहापानानंतर पांड्या (०), ऋषभ पंत (१८), रहाणे (५१), इशांत शर्मा (०), मोहम्मद शमी (८) आणि अश्विन (२५) असे ६ गडी भारताने गमावले. इंग्लंडकडून मोईन अली ४, स्टोक्स-अँडरसनने २-२ आणि ब्रॉड-कुर्रान १-१ बळी टिपला.

काल तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने ८ बाद २६० धावांपर्यंत मजल मारली. तेथून आज दिवसाचा खेळ सुरू करताना पहिल्या चेंडूवर इंग्लंडला धक्का बसला. स्टुअर्ट ब्रॉडच्या रूपाने नववा गडी बाद झाला. त्यानंतर या डावात जोस बटलरने सर्वाधिक ६९ धावा केल्या. तर कर्णधार जो रूट ४८ धावांवर धावचीत झाला. भारताकडून मोहम्मद शमीने ४, इशांत शर्माने २ तर बुमराह आणि अश्विनने १-१ बळी टिपला आहे.

त्याआधी भारताचा पहिला डाव २७३ धावांवर आटोपला. चेतेश्वर पुजाराने एकाकी झुंज देत नाबाद १३२ धावांची खेळी केली. पण त्याला इतर फलंदाजांची अपेक्षित साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताला डावाअखेरीस केवळ २७ धावांची आघाडी मिळवता आली. चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली या जोडीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या सत्रात कोहली ४६ धावांवर बाद झाला. इंग्लंडकडून मोईन अलीने ५, ब्रॉडने ३ तर स्टोक्स आणि कुर्रानने १-१ बळी टिपला.

तत्पूर्वी इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद २४६ धावा केल्या. या सामन्यात संधी मिळालेल्या सॅम कुरानने आपली निवड सार्थ ठरवत भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. त्याने १३६ चेंडूंत ७८ धावांची झुंजार खेळी केली. त्याला मोईन अलीने चांगली साथ दिली. पहिल्या डावात भारताकडून बुमराहने ३, इशांत शर्मा, मोदम्मद शमी आणि अश्विनने प्रत्येकी २ आणि पांड्याने १ बळी टिपला.

लोकसत्ता समालोचन

Live Blog

Highlights

 • 21:10 (IST)

  अर्धशतकानंतर लगेच रहाणे बाद, भारताचे सात गडी माघारी

  उपकर्णधार रहाणेने आपले अर्धशतक साजरे केले. त्यानंतर लगेच रहाणे बाद झाला. मोईन अलीने त्याल बाद केले.

 • 20:15 (IST)

  उपकर्णधार रहाणेवर मदार, चहापानापर्यंत भारत ४ बाद १२६

  कोहलीने अर्धशतकी खेळी केली, पण दुसऱ्या सत्राच्या शेवटी कोहली बाद झाला. त्यामुळे भारताची उपकर्णधार रहाणेवर मदार आहे. चहापानापर्यंत भारताने ४ बाद १२६ धावा केल्या आहेत.

 • 20:10 (IST)

  भारताला मोठा धक्का, कर्णधार कोहली माघारी

  दुसऱ्या डावात भारताला मोठा धक्का बसला. कर्णधार कोहली अर्धशतकी खेळी करून माघारी परतला. मोईन अलीने त्याला बाद केले.

 • 15:55 (IST)

  इंग्लंडचा डाव आटोपला, भारतापुढे २४५ धावांचे आव्हान

  भारत-इंग्लंड चौथ्या कसोटीत इंग्लंडचा दुसरा डाव सर्वबाद २७१ धावांपर्यंत आटोपला. भारतापुढे  विजयासाठी २४५ धावांचे लक्ष्य आहे.

21:25 (IST)02 Sep 2018
नववा गडी माघारी, शमी बाद

नववा गडी माघारी, शमी बाद

21:14 (IST)02 Sep 2018
भारत पराभवाच्या छायेत, आठवा गडी बाद

भारत पराभवाच्या छायेत, आठवा गडी बाद

21:10 (IST)02 Sep 2018
अर्धशतकानंतर लगेच रहाणे बाद, भारताचे सात गडी माघारी

उपकर्णधार रहाणेने आपले अर्धशतक साजरे केले. त्यानंतर लगेच रहाणे बाद झाला. मोईन अलीने त्याल बाद केले.

20:51 (IST)02 Sep 2018
उपकर्णधार अजिंक्य रहाणेचे अर्धशतक, विजयासाठी १००हून कमी धावांची गरज

उपकर्णधार अजिंक्य रहाणेचे अर्धशतक, विजयासाठी १००हून कमी धावांची गरज

20:33 (IST)02 Sep 2018
हार्दिक पांड्या शून्यावर बाद, भारताच्या अडचणीत वाढ

हार्दिक पांड्या शून्यावर बाद झाला. पंतच्या आधी पांड्याला फलंदाजीला पाठवण्याची योजना फसली. त्यामुळे भारताच्या अडचणीत वाढ झाली आहे.

20:15 (IST)02 Sep 2018
उपकर्णधार रहाणेवर मदार, चहापानापर्यंत भारत ४ बाद १२६

कोहलीने अर्धशतकी खेळी केली, पण दुसऱ्या सत्राच्या शेवटी कोहली बाद झाला. त्यामुळे भारताची उपकर्णधार रहाणेवर मदार आहे. चहापानापर्यंत भारताने ४ बाद १२६ धावा केल्या आहेत.

20:10 (IST)02 Sep 2018
भारताला मोठा धक्का, कर्णधार कोहली माघारी

दुसऱ्या डावात भारताला मोठा धक्का बसला. कर्णधार कोहली अर्धशतकी खेळी करून माघारी परतला. मोईन अलीने त्याला बाद केले.

19:47 (IST)02 Sep 2018
विराटचे अर्धशतक, रहाणेच्या साथीने डाव सावरला

विराटचे अर्धशतक, रहाणेच्या साथीने डाव सावरला

17:37 (IST)02 Sep 2018
भारताची खराब सुरूवात, उपहारापर्यंत ३ बाद ४६

भारताची खराब सुरूवात, उपहारापर्यंत ३ बाद ४६

16:44 (IST)02 Sep 2018
पुजारा पाठोपाठ धवन तंबूत, भारताचा तिसरा गडी माघारी

पुजारा पाठोपाठ धवन तंबूत गेला. भारताचा तिसरा गडी माघारी गेला असून तो स्लीपमध्ये झेलबाद झाला.

16:33 (IST)02 Sep 2018
पहिल्या डावातील शतकवीर पुजारा बाद, भारताला दुसरा धक्का

पहिल्या डावात नाबाद शतक ठोकणारा  पुजारा बाद झाला. भारताला दुसरा धक्का बसला.

16:12 (IST)02 Sep 2018
भारताला पहिला धक्का, राहुल भोपळाही न फोडता तंबूत

भारताला पहिला धक्का, राहुल भोपळाही न फोडता तंबूत

15:55 (IST)02 Sep 2018
इंग्लंडचा डाव आटोपला, भारतापुढे २४५ धावांचे आव्हान

भारत-इंग्लंड चौथ्या कसोटीत इंग्लंडचा दुसरा डाव सर्वबाद २७१ धावांपर्यंत आटोपला. भारतापुढे  विजयासाठी २४५ धावांचे लक्ष्य आहे.

15:33 (IST)02 Sep 2018
दिवसाच्या पहिल्या चेंडूवर इंग्लंडला धक्का, नववा गडी बाद

दिवसाच्या पहिल्या चेंडूवर इंग्लंडला धक्का, नववा गडी बाद. स्टुअर्ट ब्रॉड माघारी

टॅग Bcci,Icc,Ind Vs Eng
Next Stories
1 ISSF World Championship : भारतीय नेमबाजांना २ सुवर्णपदकं
2 Ind vs Eng : जाणून घ्या चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रचले गेलेले ६ विक्रम
3 Asian Games 2018 : नोकरी टिकवायची असल्यास कामगिरी सुधारा; हॉकी इंडियाची प्रशिक्षकांना तंबी
Just Now!
X