India vs England 4th test Live Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात आज दिवसअखेर भारताने बिनबाद १९ धावा केल्या. त्याआधी इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद २४६ धावा केल्या. या सामन्यात संधी मिळालेल्या सॅम कुरानने आपली निवड सार्थ ठरवत भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. त्याने १३६ चेंडूंत ७८ धावांची झुंजार खेळी केली. त्याला मोईन अलीने चांगली साथ दिली.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली, पण हा निर्णय पहिल्या सत्रात त्यांच्या विरोधात गेल्याचे दिसले. सलामीवीर किटन जेनींग्ज शून्यावर बाद झाला. बुमराहने त्याला बाद केले. त्यानंतर कर्णधार जो रूट ४ धावा करून तर जॉनी बेअरस्टो ६ धावा करून तंबूत परतला. इशांत शर्मा आणि बुमराह यांनी अनुक्रमे त्यांना माघारी धाडले. अनुभवी कुकने काही काळ खेळपट्टीवर तग धरला. परंतु हार्दिक पांड्याने त्याचा काटा काढला.

दुसऱ्या सत्रात स्टोक्स २३ धावांवर तर बटलर २१ धावांवर बाद झाला. दोनही बळी शमीने टिपले. त्यानंतर सॅम कुर्रान आणि मोईन अली यांनी चहापानापर्यंत किल्ला लढवला. पण तिसऱ्या सत्रात अश्विनने ही जोडी फोडली. मोईन अली ४० धावांवर बाद झाला. पाठोपाठ आदिल रशीदही बाद झाला. इशांत शर्माने त्याला पायचीत केले. त्यानंतर स्टुअर्ट ब्रॉड स्वस्तात बाद झाला. अखेर भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना कुरान त्रिफळाचित झाला. भारताकडून बुमराहने ३, इशांत शर्मा, मोदम्मद शमी आणि अश्विनने प्रत्येकी २ आणि पांड्याने १ बळी टिपला.

दरम्यान,  मालिकेतील पहिल्या दोन कसोटी इंग्लंडच्या नावावर आहेत, तर तिसऱ्या कसोटीत भारताने पुनरागमन करत मालिकेत २-१ असे आपले आव्हान कायम राखले आहे. त्यामुळे मालिका जिंकण्याच्या उद्देशाने इंग्लंडचा संघ मैदानात उतरला आहे, तर भारताला हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याची संधी आहे.

या सामन्यात भारताच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इंग्लंडच्या संघात मात्र दोन बदल करण्यात आले आहेत. जायबंदी ख्रिस वोक्सच्या जागी सॅम कुर्रानला, तर ओली पोपच्या जागी मोईन अलीला संधी देण्यात आली आहे.

Live Blog

22:36 (IST)30 Aug 2018
कुर्रानने भारताला रडवले, इंग्लंड पहिल्या डावात सर्वबाद २४६

कुर्रानने भारताला रडवले, इंग्लंड पहिल्या डावात सर्वबाद २४६

22:20 (IST)30 Aug 2018
स्टुअर्ट ब्रॉड बाद, इंग्लंड ९ बाद २४०

५० धावांची भागीदारी झाल्यानंतर भारताला जोडी फोडण्यात यश आले. स्टुअर्ट ब्रॉड स्वस्तात माघारी परतला.

21:29 (IST)30 Aug 2018
इंग्लंडचा आठवा गडी बाद, आदिल रशीद तंबूत

इंग्लंडचा आठवा गडी बाद, आदिल रशीद तंबूत

20:16 (IST)30 Aug 2018
कुर्रान-अली जोडीने इंग्लंडला सावरले, चहापानापर्यंत ६ बाद १३९

कुर्रान-अली जोडीने इंग्लंडला सावरले, चहापानापर्यंत ६ बाद १३९

19:07 (IST)30 Aug 2018
स्टोक्स २१ धावांवर तंबूत, इंग्लंडची अवस्था ६ बाद ८६

स्टोक्स २१ धावांवर तंबूत, इंग्लंडची अवस्था ६ बाद ८६

18:25 (IST)30 Aug 2018
इंग्लंडचा निम्मा संघ माघारी, धोकादायक फलंदाज बटलर तंबूत

इंग्लंडचा निम्मा संघ माघारी, धोकादायक फलंदाज बटलर तंबूत

17:34 (IST)30 Aug 2018
भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, उपहारापर्यंत इंग्लंड ४ बाद ५७

भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, उपहारापर्यंत इंग्लंड ४ बाद ५७

17:02 (IST)30 Aug 2018
इंग्लंडला मोठा धक्का, अनुभवी कूक माघारी

इंग्लंडला मोठा धक्का, अनुभवी कूक माघारी

16:16 (IST)30 Aug 2018
कर्णधार जो रूट माघारी, भारताला दुसरे यश

कर्णधार जो रूट ४ धावांवर माघारी. भारताला दुसरे यश. इशांत शर्माला पहिले यश

15:43 (IST)30 Aug 2018
इंग्लंडला पहिला धक्का, जेनिंग्स बाद

नाणेफेक जिंकलेल्या इंग्लंडला पहिला धक्का बसला. सलामीवीर कीटन जेनिंग्स भोपळाही न फोडता बाद झाला. बुमराहने केले पायचीत