05 July 2020

News Flash

Ind vs Eng 4th test : शतकवीर पुजाराची एकाकी झुंज, दिवसअखेर इंग्लंड बिनबाद ६

India vs England 4th test Day 2

शतकवीर चेतेश्वर पुजारा

India vs England 4th test Live Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने बिनबाद ६ धावा केल्या. त्याआधी भारताचा पहिला डाव २७३ धावांवर आटोपला. चेतेश्वर पुजाराने एकाकी झुंज देत नाबाद १३२ धावांची खेळी केली. पण त्याला इतर फलंदाजांची अपेक्षित साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताला डावाअखेरीस केवळ २७ धावांची आघाडी मिळवता आली.

काल पहिल्या दिवसअखेर भारताने बिनबाद १९ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने आज पहिल्या सत्रात दोन गडी गमावले. शिखर धवन (२३) आणि लोकेश राहुल (१९) हे दोघेही ब्रॉडच्या गोलंदाजीवर बाद झाले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली या जोडीने डाव सावरला. पण दुसऱ्या सत्रात ही जोडी इंग्लंडच्या गोलंदाजाने फोडली. कोहली ४६ धावांवर बाद झाला. पाठोपाठ उपकर्णधार अजिंक्य रहाणे ११ धावांवर माघारी परतला. नवोदित ऋषभ पंतकडून भारताला अपेक्षा होत्या. पण तो २९ चेंडूत ० धावा करून बाद झाला. मोईन अलीने त्याला बाद केला. त्यामुळे चहापानापर्यंत भारताची अवस्ठा ५ बाद १८१ अशी झाली. तिसऱ्या सत्रातही फिरकीपटू मोईन अलीने आपल्या फिरकीची जादू कायम ठेवली. त्याने हार्दिक पांड्या (४), अश्विन (१) आणि मोहम्मद शमी (०) यांना तंबूत धाडले. बुमराने पुजाराला चांगली साथ दिली. पण अखेर तो बाद झाला. इंग्लंडकडून मोईन अलीने ५, ब्रॉडने ३ तर स्टोक्स आणि कुर्रानने १-१ बळी टिपला.

त्याआधी काल इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद २४६ धावा केल्या आहेत. या सामन्यात संधी मिळालेल्या सॅम कुरानने आपली निवड सार्थ ठरवत भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. त्याने १३६ चेंडूंत ७८ धावांची झुंजार खेळी केली. त्याला मोईन अलीने चांगली साथ दिली. पहिल्या डावात भारताकडून बुमराहने ३, इशांत शर्मा, मोदम्मद शमी आणि अश्विनने प्रत्येकी २ आणि पांड्याने १ बळी टिपला.

लोकसत्ता समालोचन

Live Blog

सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड

Highlights

  • 20:44 (IST)

    नवोदित ऋषभ पंत बाद, चहापानापर्यंत भारताचा निम्मा संघ माघारी

    नवोदित ऋषभ पंत बाद झाला. त्यानंतर चहापानाची विश्रांती घेण्यात आली.  भारत ६५ धावांनी पिछाडीवर आहे.

  • 17:31 (IST)

    कोहली-पुजारा जोडीची अर्धशतकी भागीदारी, उपहारापर्यंत भारत २ बाद १००

    ५० धावांवर भारताचे सलामीवीर बाद झाल्यानंतर कोहली-पुजारा जोडीने अर्धशतकी भागीदारी केली आणि संघाला शतकी मजल मारून दिली. 

23:05 (IST)31 Aug 2018
शतकवीर पुजाराची एकाकी झुंज, दिवसअखेर इंग्लंड बिनबाद ६

शतकवीर पुजाराची एकाकी झुंज, दिवसअखेर इंग्लंड बिनबाद ६

21:40 (IST)31 Aug 2018
पुजाराचे झुंजार शतक, इतर फलंदाज मात्र गडगडले

पुजाराचे झुंजार शतक, इतर फलंदाज मात्र गडगडले

21:32 (IST)31 Aug 2018
भारताच्या फलंदाजांची घसरगुंडी, नववा गडी तंबूत

भारताच्या फलंदाजांची घसरगुंडी, नववा गडी तंबूत

20:53 (IST)31 Aug 2018
अश्विन पाठोपाठ शमी तंबूत, भारताचे आठ गडी माघारी

अश्विन पाठोपाठ शमी तंबूत, भारताचे आठ गडी माघारी

20:47 (IST)31 Aug 2018
हार्दिक पांड्या तंबूत, भारताचा सहावा गडी माघारी

भारताचा हार्दिक पांड्या तंबूत परतला. फिरकीपटू मोईन अलीने त्यासा बाद केले. भारताने सहावा गडी गमावला.

20:44 (IST)31 Aug 2018
नवोदित ऋषभ पंत बाद, चहापानापर्यंत भारताचा निम्मा संघ माघारी

नवोदित ऋषभ पंत बाद झाला. त्यानंतर चहापानाची विश्रांती घेण्यात आली.  भारत ६५ धावांनी पिछाडीवर आहे.

19:26 (IST)31 Aug 2018
उपकर्णधार रहाणे माघारी, भारताचा ४था गडी बाद

उपकर्णधार रहाणे रहाणे ११ धावांवर माघारी परतला. भारताचा ४था गडी बाद झाला.

19:14 (IST)31 Aug 2018
पुजाराचे अर्धशतक, भारताची धावसंख्या १५०पार

पुजाराचे अर्धशतक, भारताची धावसंख्या १५०पार

18:53 (IST)31 Aug 2018
कर्णधार कोहली बाद, भारताला तिसरा धक्का

कर्णधार कोहली बाद, भारताला तिसरा धक्का.

17:31 (IST)31 Aug 2018
कोहली-पुजारा जोडीची अर्धशतकी भागीदारी, उपहारापर्यंत भारत २ बाद १००

५० धावांवर भारताचे सलामीवीर बाद झाल्यानंतर कोहली-पुजारा जोडीने अर्धशतकी भागीदारी केली आणि संघाला शतकी मजल मारून दिली. 

16:38 (IST)31 Aug 2018
दोनही सलामीवीर तंबूत, ब्रॉडचा डबल धमाका

शिखर धवन बाद. भारताची दोनही सलामीवीर तंबूत, ब्रॉडचा डबल धमाका

15:56 (IST)31 Aug 2018
सलामीवीर राहुल बाद, भारताला पहिला धक्का

सलामीवीर राहुल बाद, भारताला पहिला धक्का, रिव्ह्यूदेखील घालवला वाया

Next Stories
1 एशियाडमध्ये कमावलं, Diamond League मध्ये गमावलं; नीरज चोप्राला पदकाची हुलकावणी
2 BLOG Ind vs Eng 4th test : कसोटी जिंकण्यासाठी भारतापुढे असलेले धावांचे पर्याय …
3 Youth Boxing Championship : भारताच्या नितूला सुवर्णपदक
Just Now!
X