News Flash

भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय

इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले.

अनुकूल रॉयची भेदक फिरकी तसेच हार्विक देसाई व हिमांशू राणा यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताच्या युवा (१९ वर्षांखालील) संघाने दुसऱ्या एकदिवसीय लढतीत इंग्लंडवर १२९ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले. भारताची सुरुवात आश्वासक झाली नसली तरी राणाने सुरुवातीला दमदार फलंदाजी करत संघाचा धावफलक हलता ठेवला. राणाने १० चौकारांच्या जोरावर ५८ धावांची खेळी साकारली. राणा बाद झाल्यावर भारतीय संघ पुन्हा अडचणीत सापडला होता. पण त्यानंतर हार्विकने ६२ चेंडूंमध्ये १० चौकारांच्या जोरावर ७५ धावा केल्या आणि त्यामुळे भारतीय युवा संघाला २८७ धावांपर्यंत मजल मारता आली.

भारताच्या २८७ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला सुरुवातीपासूनच धक्के बसत गेले आणि यामधून त्यांना सावरता आले नाही. सुरुवातीला कमलेश नागरकोटी, शिवम मावी आणि इशान पोरल यांनी भेदक मारा करत इंग्लंडचे कंबरडे मोडले. त्यानंतर डावखुरा फिरकीपटू रॉयने तिखट मारा करत इंग्लंडला पराभवाच्या छायेत ढकलले.

संक्षिप्त धावफलक

  • भारत : ५० षटकांत ८ बाद २८७ (हार्विक देसाई ७५, हिमांशू राणा ५८; मॅथ्यू फिशर ४/४४) विजयी वि. इंग्लंड : इंग्लंड : ३३.४ षटकांत सर्वबाद १५८ (डेलरे रॉवलिन्स ४६; अनुकूल रॉय ३/३४, शिवम मावी २/१३).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 2:16 am

Web Title: india vs england 5
Next Stories
1 ‘डेव्हिस लढतींद्वारे महाराष्ट्रातील टेनिसला चालना मिळेल!’
2 चहलचा धमाका, २५ धावांमध्ये ६ बळी, भारताने मालिका जिंकली
3 खेळातील गुणवत्ता शोधण्यासाठी फक्त ५० लाख, तर दिव्यांग खेळाडूंसाठीची तरतूद ४ कोटींवरून १ लाखावर!
Just Now!
X