पराभवांची मालिका खंडित करीत ट्रेंट ब्रिजवरील तिसरी कसोटी जिंकणारा भारतीय संघ गुरुवारपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीत हे विजयी अभियान कायम राखण्यासाठी उत्सुक आहे.
पहिल्या दोन कसोटी सामन्यांत मानहानीकारक पराभव पत्करल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नॉटिंगहॅमच्या तिसऱ्या कसोटीत अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन करीत २०३ धावांनी दणदणीत विजय संपादन केला. मात्र तरीही भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-२ असा पिछाडीवर आहे.
तिसऱ्या कसोटीत विराटने अनुक्रमे ९७ आणि १०३ धावा करताना विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. याशिवाय मालिकेत भारताने मिळवलेल्या ४६ पैकी ३८ बळी हे वेगवान गोलंदाजांचे आहेत. चौथ्या कसोटीसाठीच्या हिरव्यागार खेळपट्टीवर भारताची मदार हार्दिक पंडय़ासह वेगवान गोलंदाजांवर असेल. जसप्रित बुमरा खेळू न शकल्यास इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीसोबत उमेश यादवचा समावेश केला जाईल.
इंग्लंडला जॉनी बेअरस्टोच्या तंदुरुस्तीची चिंता तीव्रतेने भेडसावत आहे. वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सच्या दुखापतीची चिंता कायम राहिल्यास सॅम करनचे संघात पुनरागमन होऊ शकेल.
संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), करुण नायर, हार्दिक पंडय़ा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, हनुमा विहारी, इशांत शर्मा, उमेश यादव, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रित बुमरा.
इंग्लंड : जो रूट (कर्णधार), अॅलिस्टर कुक, किटॉन जेनिंग्स, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, ऑलिव्हर पोप, मोईन अली, आदिल रशीद, सॅम करन, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड ख्रिस ब्रॉड, ख्रिस वोक्स, बेन स्टोक्स, जेम्स व्हिन्से.
- सामन्याची वेळ : दुपारी ३.३० वाजल्यापासून.
- थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन ३.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 30, 2018 2:04 am