News Flash

बेन स्टोक्सनं घेतलेल्या झेलवरुन वाद; पंचाच्या निर्णयावर रुट- कोहलीच्या परस्पर विरोधी प्रतिक्रिया, बघा Video

सोशल मीडियावर स्टोक्स आणि इंग्लंडच्या खेळाडूंना ट्रोल करण्यात येत आहे.

अहमदाबाद येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सान्याच्या पहिल्या डावांत इंग्लंडचा संघ ११२ धावांत गारद झाला. अक्षर पटेल आणि आर. अश्विन या फिरकी जोडीनं अचूक टप्यावर गोलंदाजी करत ९ गड्यांना बाद केलं. अक्षर पटेल यानं सहा बळी घेत इंग्लंडच्या अडचणी वाढवल्या. इंग्लंड संघाला ११२ धावांवर रोखल्यानंतर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी संयमी फलंदाजी करत डावाला आकर देण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण करत असताना इंग्लंडच्या बेन स्टोक्स यानं घेतलेल्या एका झेलमुळे वादंग निर्माण झाला आहे.

जेम्स अँडरसनच्या षटकातील एक चेंडू गिलच्या बॅटची कड घेऊन बेन स्टोक्सकडे गेला. बेन स्टोक्सनं झेल घेतला मात्र, त्याचवेळी चेंडू जमीला घसला होता. पंचाच्या ही बाब लक्षात आल्यामुळे गिलला नाबद दिल गेलं. पण यावेळी इंग्लंडचा कर्णधार जो रुट, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड यांनीही पंचाच्या निर्णायावर नाराजी व्यक्त केली. इंग्लंडच्या खेळाडूंनी खोटारडी अपील केली. पंचानी या निर्णयासाठी तिसऱ्या पंचाची मदत घेतली. तिसऱ्या पंचानं बेन स्टोक्सनं घेतलेला झेल रिप्लेमध्ये बारकाईनं पाहिला. यामध्ये पंचाला स्टोक्स आणि इंग्लंडच्या खेळाडूचा खोटारडेपणा स्पष्टपणे दिसून आला. तिसऱ्या पंचांनी गिल याला नाबाद दिलं.

पाहा व्हिडीओ –

यानंतर इंग्लिश कर्णधार रूट आणि भारत कर्णधार विराट कोहलीने कॉन्ट्रास्ट प्रतिक्रिया दिल्या. रूट एकीकडे निराश दिसला तर इंग्लंडच्या अपीलवर विराट कोहली चकित झाला. रूटने ऑन फील्ड पंचांशी प्रदीर्घ चर्चा केल्यावर मान हलवत आपल्या फिल्डिंगच्या जागी परतला.

पाहा व्हिडीओ –

सोशल मीडियावर स्टोक्स आणि इंग्लंडच्या खेळाडूंना ट्रोल करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 9:24 pm

Web Title: india vs england ben stokes cheating caught on camera root anderson and broad fight with umpire nck 90
टॅग : India Vs England
Next Stories
1 Ind vs Eng: …अन् मैदानावर विराटचा जोरदार जल्लोष; पाहा Video
2 विराटने स्मिथची केली नक्कल, बघा व्हिडीओ
3 Ind vs Eng: राहुल गांधींचा Video पोस्ट करत सेहवागने उडवली इंग्लंडची खिल्ली
Just Now!
X