भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाली आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेला पराभव विसरून भारतीय संघ नव्या हंगामाची सुरुवात विजयाने करू इच्छित आहे. या व्यतिरिक्त, विराटसेना इंग्लंडच्या भूमीवर पहिली मालिका जिंकण्यासाठी आतूर असेल. आजपासून नॉटिंगहॅममध्ये पहिली लढत रंगत आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

कोण आत कोण बाहेर?

फिरकीपटू आर. अश्विन आणि इशांत शर्मा यांना या कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. दुसरीकडे, केएल राहुल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज यांना संधी मिळाली आहे. रवींद्र जडेजाचा फिरकीपटू म्हणून संघात समावेश आहे. भारतीय संघ चार वेगवान गोलंदाजांसह हा सामना खेळणार आहे, तर इंग्लंडने त्यांच्या संघात एकाही फिरकी गोलंदाजाचा समावेश केलेला नाही.

 

 

हेड-टू-हेड

आतापर्यंत इंग्लंड आणि भारत या संघात एकूण १२६ कसोटी सामने झाले आहेत. त्यापैकी २९ सामन्यात भारताने, तर ४८ सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आहे. तर ४९ सामने अनिर्णित ठरले आहेत. या सामन्यांपैकी ६२ सामने इंग्लंडमध्ये झाले आहेत. त्यात ३४ सामन्यात इंग्लंडने, तर ७ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर २१ सामने अनिर्णित ठरले आहेत.

 

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारतीय संघ – रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार),  ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह,  मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, केएल राहुल.

इंग्लंडचा संघ – जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉमिनिक सिबली, जोस बटलर, सॅम करन, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, डोमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, झॅक क्रॉली, ओली रॉबिन्सन.