इंग्लंड संघाचा माजी कर्णधार केविन पीटरसन यानं भारतीय संघ व्यवस्थापनाला चौथ्या कसोटी सामन्यात फिरकीला मदत मिळणारी खेळपट्टी तयार न करण्याची विनंती केली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर केविन पीटरसन यानं ट्विट करत आपलं मतं व्यक्त केलं आहे. यावेळी पीटरसन यानं भारतीय संघाचं अभिनंदन तर केलेच आहे शिवाय खेळपट्टी फिरकीला मदत मिळणारी नसावी. खेळाडूंनाही तसेच वाटत असेल, असा सल्लाही दिला आहे.
भारतीय संघानं नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये तिसरा कसोटी सामना दुसऱ्या दिवशीच १० विकेटच्या मोठ्या फरकानं जिंकला. या विजयासह चार सामन्याच्या कसोटी मालिकेत २-१ नं आघाडी घेतली आहे. तसेच कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या दिशेन आगेकूच केली आहे. पीटरसनने सामना संपल्यानंतर हिंदीमध्ये ट्विट केलं आहे.
आणखी वाचा- चांगली की वाईट?; खेळपट्टीवरुन आजी-माजी क्रिकेटपटूंमध्येच रंगला सामना
काय म्हणाला ट्विटमध्ये? –
‘एका सामन्यासाठी अशी खेळपट्टी असेल तर ठीक आहे. जेथे फलंदाजाला कौशल्य आणि संयमाची चाचणी होते. पण अशा प्रकारची खेळपट्टी पुन्हा नसावी. मला वाटतेय सर्व खेळाडूंनाही अशी खेळपट्टी नकोय. खूपच छान इंडिया..!
Ek match ke liye aesa wicket theek hai jaha ballebaaz ki skill aur takaneek ka test hota hai . LEKIN main iss tara ka wicket aur nahi dekhna chahta aur mujhe lagta hai ki saare khiladi bhi nahi chahte . Bohut ache , india
— Kevin Pietersen
आपल्या ट्विटमुळे पीटरसन नेहमीच चर्चेत असतो. सोशल मीडियावर पीटरसन नेहमीच चर्चेत असतो. आशा करतोय की नाणेफेक जिंकल्यानंतर सामना जिंकणारी खेळपट्टी नसावी, असं ट्विट इंग्लंडनं नाणेफेक जिंकल्यानंतर केलं होतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 26, 2021 1:55 pm