लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात, मात्र काही जणांसाठी या गाठी क्रिकेटच्या मैदानात बांधल्या जातात. लॉर्ड्सच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यादरम्यान एका मुलाने सामना पाहण्यासाठी आलेल्या आपल्या मैत्रिणीला प्रपोज करुन तिचा होकार मिळवला आहे. दुसऱ्या सामन्यादरम्यान घडलेला हा प्रकार सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे त्या मुलीनेही काही क्षणांचा विचार करत हे प्रपोजल मान्य केलं आहे. या दोघांमधले हे सुंदर क्षण सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

दरम्यान सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडने धावांचा डोंगर उभा केला आहे. जो रुटचं शतक हे इंग्लंडच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य ठरलं. पहिल्या डावात इंग्लंडने ७ गडी गमावत ३२२  धावा केल्या. जो रुटने या सामन्यात नाबाद ११३  धावा केल्या.